Pragyasingh Thakur esakal
क्रीडा

VIDEO : खासदार प्रज्ञा ठाकुरांचा महिला खेळाडूंसोबत 'कबड्डीचा डाव'

सकाळ डिजिटल टीम

भोपाळच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर एका नव्या रुपात समोर आल्या आहेत.

भोपाळ (मध्य प्रदेश) : भोपाळच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर (Pragyasingh Thakur) एका नव्या रुपात समोर आल्या आहेत. त्यांचा नुकताच एक व्हिडिओ व्हायरला झाला असून त्यात त्या कबड्डी (Kabaddi) खेळताना दिसत आहेत. प्रज्ञा ठाकूर या शक्तीनगर परिसरात देवीच्या दर्शनासाठी गेल्या होत्या. प्रार्थना केल्यानंतर, प्रज्ञा ठाकूर यांनी मैदानातील कबड्डी खेळाडू आणि मैदानावर उपस्थित प्रशिक्षकाला मंचावर बोलावले. त्यानंतर त्यांनी क्रीडापटूंचा सन्मान केला.

यावेळी खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांना खेळाडूंनी कबड्डी खेळण्याची विनंती केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन महिला खेळाडूंबरोबर काही क्षण कबड्डी खेळण्याचा आनंद त्यांनी लुटला. हा त्यांचा खेळाचा व्हिडिओ सध्या प्रचंड व्हायरल होत आहे. यापूर्वी जुलै महिन्यात त्या शक्तीनगरमध्येच बास्केटबॉल खेळताना दिसल्या होत्या. शक्तीनगरच्या बास्केटबॉल मैदानावर वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, त्या कार्यक्रमात प्रज्ञा ठाकूर सहभागी झाल्या होत्या. तिथे त्यांनी बास्केटबॉल खेळण्याचा आनंद लुटला होता.

दरम्यान, खेळाडू मैदानावर सराव करत होते. खेळाडूंना खेळताना पाहून त्या स्वत: ला रोखू शकल्या नव्हत्या आणि त्यांच्यात जावून त्या खेळाचा आनंद घेतला होता. भारतीय जनता पक्षाच्या खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे. या आजारांमुळे त्यांना चालताना अडचण निर्माण होते, त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून त्या व्हिल चेअरचा आधार घेत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Supriya Sule Ajit Pawar : ‘तू आमच्या मनात कायम राहशील’; भाऊबीजेच्या दिवशी सुप्रिया सुळे अजितदादांच्या आठवणीने भावूक

IND vs NZ 4th ODI : शुभमन गिल, केएल राहुल OUT, मग रोहित शर्मासोबत सलामीला कोण येणार? श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली भारताची Playing XI

Jalgaon Accident News : रेल्वेच्या कामासाठी खोदलेल्या खड्ड्यामुळे अपघात, तरुणाचा मृत्यू;

मुलीसोबत ती गोष्ट घडली आणि रवीना टंडनने नॉनव्हेज खाणं कायमचं बंद केलं; आठवण सांगत म्हणाली, 'आम्ही क्रूझवर होतो अन्...

Latest Marathi News Live Update : मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचे खरे रूप आदिवासी कार्यकर्त्या निशा भगत यांनी जीवन संपवल्यावर समोर आले- भाजपचा आरोप

SCROLL FOR NEXT