India vs Western Australia Practice Match  esakal
क्रीडा

T20 World Cup : वर्ल्डकपचं अवघड आहे गड्या! सराव सामन्यात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने टीम इंडियाला पाणी पाजले

अनिरुद्ध संकपाळ

India vs Western Australia Practice Match : भारताला टी 20 वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वीच मोठा धक्का बसला. सराव सामन्यात वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत संघ व्यवस्थापनाच्या डोळ्यात अंजन घातले. प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्टर्न ऑस्ट्रेलियाने भारतासमोर 169 धावांचे तसे चेस होणारे आव्हान ठेवले होते. मात्र भारताला 20 षटकात 8 बाद 132 धावांपर्यंतच मजल मारता आली. सलामीवीर केएल राहुलने 75 धावांची खेळी करून देखील भारताला पराभवाचा धक्का सहन करावा लागला. भारताच्या ठराविक अंतराने विकेट्स पडल्याने भारताला हे आव्हान पार करता आले नाही.

प्रथम फलंदाजी करणाऱ्या वेस्टर्न ऑस्ट्रेलियाकडून निक हॉबसन आणि ड आर्सी शॉर्ट यांनी अर्धशतकी खेळी केली. हॉबसनने 64 तर शॉर्टने 52 धावांची खेळी केली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी 110 धावांची भागीदारी रचली. त्यानंतर भारतीय गोलदाजांनी जोरदार कमबॅक करत ऑस्ट्रेलियाला 170 धावांच्या आत रोखले. अश्विनने 3 तर हर्षल पटेलने 2 विकेट्स घेतल्या.

दरम्यान, भारताचे सलामीवीर केएल राहुल आणि ऋषभ पंत वेस्टर्न ऑस्ट्रेलियाचे 169 धावांचे आव्हान घेऊन मैदानात उतरले. मात्र पंत 9 धावांची भर घालून परतला. त्यानंतर दीपक हुड्डा देखील 6 धावा करून माघारी फिरला. हार्दिक पांड्याने 17 धावांची खेळी केली. मात्र त्यालाही मोठी खेळी करण्यात अपयश आले.

अक्षर पटेल 2 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला तर दिनेश कार्तिकने 14 चेंडूत 10 धावा केल्या. दरम्यान, एकटा किल्ला लढवाणारा केएल राहुल 19 व्या षटकात 55 चेंडूत 74 धावा करून बाद झाला. अखेर भारताचा डाव 20 षटकात 8 बाद 132 धावात संपुष्टात आला. भारताकडून केएल राहुल, हार्दिक पांड्या आणि दिनेश कार्तिक यांनाच दुहेरी आकडा गाठता आला.

भारताने वेस्टर्न ऑस्ट्रेलियाविरूद्धचा पहिला सराव सामना 13 धावांनी जिंकला होता. सूर्यकुमार यादवने 35 चेंडूत 52 धावांची खेळी केली होती. आजच्या सामन्यात विराट कोहली आणि सूर्यकुमार यादवला विश्रांती देण्यात आली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local Train: लोकलमधील AC १० मिनिटांपासून बंद, गुदमरून तीन प्रवाशी बेशुद्ध; नेमकं काय घडलं?

Konkan Railway : बाप्पाच्या आगमनासाठी कोकणात कधी जायचंय? रेल्वे आरक्षणाचे संपूर्ण वेळापत्रक आले समोर, एका क्लिकवर पहा

आधी 'हनिमून'साठी सजावट, आता चक्क 'पुजा-अर्चा'; रेल्वेच्या डब्यांमध्ये नेमकं चाललंय तरी काय? VIDEO समोर...

Latest Marathi News Live Update : मृत वारकऱ्यांच्या नातेवाईकांना चार लाखाची मदत; जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांची माहिती

Video : जगातला अनोखा विवाहसोहळा! दोन रोबोट्सनी केलं लग्न; खऱ्या वधू-वराप्रमाणे बांधली सात जन्माची गाठ, व्हिडिओ पाहून नेटकरी हैराण

SCROLL FOR NEXT