BIG Blow For Mumbai Indians as Jasprit Bumrah Likely To Be Ruled Out Of IPL 2023  
क्रीडा

IPL: पूर्वी मुंबई इंडियन्सला मोठा धक्का; जसप्रीत बुमराह पुन्हा बाहेर

आयपीएलपूर्वी मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता

सकाळ डिजिटल टीम

आयपीएलपूर्वी मुंबई इंडियन्स संघाला मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. स्टार वेगवान गोलंदाज संघातून बाहेर पडणार असल्याची माहिती समोर आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून म्हणजेच सप्टेंबर २०२२ पासून जसप्रीत बुमराह मैदानाबाहेर आहे. त्याच्या कंबरेच्या दुखापतीमुळे तो अंतरराष्ट्रीय क्रिकट खेळत नसल्याचे पाहायला मिळत आहे. यापूर्वी तो बॉर्डर गावसकर ट्रॉफी पर्यंत त्याच्या दुखापतीत सुधारणा होईल असं वाटत होत पण पदरी निराशा पडली. त्यानंतर तो आयपीएलपर्यंत ठिक होईल असं वाटत असताना नवी अपडेट समोर आली आहे.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, जसप्रीत बुमराहला आयपीएल 2023 पर्यंत तंदुरुस्त राहणे कठीण आहे. त्याचवेळी, जूनमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2023 च्या फायनलपर्यंतही तो तंदुरुस्त नसल्याच्या बातम्या आहेत. जी भारतीय संघ आणि मुंबई इंडियन्ससाठी चिंतेची बाब आहे. त्याची दुखापत गंभीर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय व्यवस्थापन आता ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये भारतात होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकापूर्वी जसप्रीत बुमराहला तंदुरुस्त करण्याचा विचार करत आहे. कारण बुमराह हा भारताच्या प्रमुख खेळाडूंपैकी एक आहे. भारताला आगामी एकदिवसीय विश्वचषक जिंकायचा असेल, तर कर्णधार रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या संघात बुमराहची उपस्थिती तितकीच महत्त्वाची आहे.

बुमराहने आत्तापर्यंत भारतासाठी 30 कसोटी, 72 एकदिवसीय आणि 60 टी-20 सामने खेळले आहेत. ज्यामध्ये जसप्रीतने अनुक्रमे 128, 121 आणि 70 विकेट घेतल्या आहेत. दुसरीकडे, जसप्रीत बुमराहने त्याच्या आयपीएल कारकिर्दीत मुंबई इंडियन्सकडून 120 सामन्यांमध्ये 145 विकेट घेतल्या आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Puja Khedkar: दिलीप खेडकर, मनोरमा खेडकर कुठे गायब? घरात आले जेवणाचे दोन डबे; नेमका प्रकार काय?

IND vs PAK, Asia Cup: 'पाकिस्तान नाही, पोपटवाडी संघ', गावसकर भारताच्या विजयनंतर थेटच बोलले

Viral Video : तरुणीने क्षणात संपविले जीवन; लोकांनी खूप समजावलं पण कोणाचंच ऐकलं नाही, हृदयद्रावक व्हिडिओ

Education News : सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल: आता ५२ वर्षांपेक्षा कमी वय असलेल्या सर्व शिक्षकांना द्यावी लागणार ‘टीईटी’ परीक्षा

Ghati Hospital: एमडी एमएस’च्या ८५ जागा वाढणार; ‘घाटी’त रुग्णसेवेला मिळेल बळकटी, तज्ज्ञ होण्याची संधी

SCROLL FOR NEXT