vinesh phogat esakal
क्रीडा

Vinesh Phogat Disqualified: विनेश फोगाटला अपात्र ठरवले, ऑलिम्पिक पदक हुकले; समोर आले मोठे अपडेट्स

Vinesh Phogat Missed olympic Medal Due To Weight Gain : पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत मनु भाकरच्या दोन आणि स्वप्नील कुसाळेच्या कांस्यपदकानंतर भारताला आता सुवर्णपदकाचे वेध लागले आहे. कुस्तीपटू विनेश फोगाट त्यासाठी निमित्त ठरतेय...

Swadesh Ghanekar

Big News Vinesh Phogat Has Been Officially Disqualified: भारताची विनेश फोगाट हिचे ऑलिम्पिक पदक हुकले आहे आणि तिला अपात्र ठरवले गेले. तिला ऑलिम्पिक स्पर्धेतू अपात्र ठरवले आहे, कारण तिचे वजन काही ग्राम अधिक असल्याचे आढळले आहे. त्यामुळे ऑलिम्पिक समितीने हा निर्णय घेतला आहे.

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत विनेश बिगरनामांकित म्हणून दाखल झाली आणि तिला आव्हानात्मक ड्रॉ मिळाला होता. पहिल्याच सामन्यात तिच्यासमोर टोकियो ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्या जपानच्या युई ससाकीचे आव्हान होते. पण, २९ वर्षीय भारतीय खेळाडूने अव्वल मानांकिस सुसाकीला चीतपट केले. त्यानंतर उपांत्यपूर्व फेरीत माजी युरोपियन विजेत्या ओक्साना लिव्हाच हिचे आणि उपांत्य फेरीत पॅन अमेरिकन्स स्पर्धेतील विजेती युस्नेलिस गुजमनचे आव्हान परतवून लावले.

भारतीय कुस्तीपटू ५० किलो वजनी गटात सहभागी झाली होती आणि तिचे वजन हे १०० ग्राम अधिक असल्याचे समोर आले होते. त्यामुळे तिच्यावर अपात्रतेची कारवाई केली गेली आहे. स्पर्धेतील नियमानुसार फोगाटला रौप्यपदकही मिळू शकत नाही. याबाबतची अधिकृत घोषणा झाली आहे. त्यामुळे तिला या स्पर्धेच्या शेवटी समाधानी रहावे लागले.

गेल्या सहा दिवसांपासून विनेश काहीही खात-पित नव्हती. सामन्यापूर्वी तिचे वजन 100 ग्रॅम जास्त होते. ती राखणे तिच्यासाठी खूप आव्हानात्मक होते आणि तेच घडले. नियमानुसार स्पर्धेच्या दिवशी खेळाडूने त्याचं वजन कायम राखणे महत्त्वाचे आहेत. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार मंगळवारी रात्री तिचे वजन दोन किलो अधिक होते. ती संपूर्ण रात्र झोपली नव्हती आणि तिने नियमाचे पालन करण्यासाठी संपूर्ण प्रयत्न केले. तिने व्यायाय केला.

IOA ने एका निवेदनात म्हटले आहे की, “महिला कुस्तीच्या ५० किलो गटातून विनेश फोगाटला अपात्र ठरवल्याची बातमी खरी आहे आणि ती खेदजनक आहे. टीमने सर्वोत्तम प्रयत्न करूनही, आज सकाळी तिचे वजन काही ग्रॅम ५० किलोपेक्षा जास्त झाले. यावेळी दलाकडून पुढील कोणतीही टिप्पणी केली जाणार नाही. भारतीय संघ तुम्हाला विनेशच्या गोपनीयतेचा आदर करण्याची विनंती करतो. हातातील स्पर्धांवर लक्ष केंद्रित करायला आवडेल.”

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लोक शिव्या देतात, स्वागताला आलेल्या कार्यकर्त्यांना अजितदादांनी झापलं; VIDEO VIRAL

Maharashtra Latest News Update: मुंबई-गोवा महामार्ग अवजड वाहनासांठी बंद

Income Tax Return : कर सल्लागारांची तारेवरची कसरत; प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करण्याची तारीख वाढविल्याचा परिणाम

BCCI निवड समितीमधील 'या' सदस्याची उचलबांगडी करणार, अजित आगरकरचा करार...

UPSC Mains: युपीएससी मेन्समध्ये उत्तर लिहिताना 'या' 5 चुका करू नका, अन्यथा...

SCROLL FOR NEXT