Singer KK Passes Away 
क्रीडा

"हम रहें या ना रहें कल..."; केके यांच्या निधनानंतर टीम इंडिया शोकाकूल

सुप्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नत्त उर्फ केके यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन

Kiran Mahanavar

Singer KK Passes Away: सुप्रसिद्ध गायक कृष्णकुमार कुन्नत्त उर्फ केके यांचे हृदय विकाराच्या झटक्याने निधन. ते ५३ वर्षांचे होते. कोलकता येथे एका कार्यक्रमाच्या दरम्यान ही घटना घडली. आज (मंगळवारी) कोलकाता येथील नझरूल मंच येथे केके यांचा गाण्याचा कार्यक्रम होता. परफॉमन्स संपल्यावर केके यांना कार्यक्रमस्थळीच हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने कोलकाता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (CMRI) येथे नेण्यात आले. रुग्णालयात तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी केके यांना मृत घोषित केले. केके यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे. भारताचा माजी सलामीवीर वीरेंद्र सेहवागसह अनेक दिग्गजांनी त्याच्या निधनावर शोक व्यक्त केला.

आयपीएल टीम कोलकाता नाईट रायडर्सने केकेच्या मृत्यूबद्दल त्याच्या एका गाण्याच्या ओळी शेअर करून शोक व्यक्त केला आहे. वीरेंद्र सेहवागने लिहिले, 'कोलकता येथे एका कार्यक्रमाच्या दरम्यान ही घटना घडली. केकेच्या निधनाबद्दल ऐकून खूप दुःख झाले. आयुष्य किती नाजूक आहे याची आणखी एक आठवण. त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांच्या संवेदना ओम शांती.

आयपीएल चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्सनेही गायकाच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. टीमने एका गाण्याच्या ओळी पोस्ट केल्या आणि लिहिले, 'कोलकाताहून एक अतिशय दुःखद बातमी. तुमच्या आत्म्याला शांती लाभो KK.

केके यांनी हिंदीत जवळपास २०० हून अधिक गाणी गायली आहे. ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटातील ‘तडप तडप...’ गाण्याने त्यांना बाॅलीवूडमध्ये ओळख मिळवून दिली होती. त्यांचा ‘पल’ म्युझिक अल्बम गाजला होता. (singer kk songs) ओम शांती ओम, गँगस्टर, दस अशा अनेक सिनेमासाठी त्यांनी गाणी गायली आहेत. फक्त हिंदीच नाही तर तमिळ, तेलगू, कन्नड, मल्याळम, मराठी, बंगाली, आसामी आणि गुजराती भाषेतील चित्रपटांमध्ये गाणी गायली आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT