क्रीडा

बोपण्णाला वगळले हा कारवाईचा भाग

सकाळवृत्तसेवा

चेन्नई - डेव्हिस करंडक संघातून रोहन बोपण्णाला वगळल्याबाबत भारतीय टेनिस संघटनेने प्रथमच खुलासा करताना देशासाठी खेळण्यास प्राधान्य न दिल्याबद्दल त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे, असे मंगळवारी स्पष्ट केले. बोपण्णाने मात्र यात तथ्य नसल्याचे म्हटले आहे.

गेल्यावर्षी सप्टेंबर 2016 रोजी झालेल्या स्पेनविरुद्धच्या लढतीत बोपण्णाने दुखापतीमुळे ऐनवेळी संघातून माघार घेतली होती. मात्र, त्याच्या दुसरऱ्याच दिवशी तो मित्रांसह पार्टीत नाच करत असल्याचा व्हिडिओ त्यानेच इन्स्टाग्रामवर अपलोड केला होता. त्याची हीच कृती कळीची ठरली आहे. संघटनेने याच घटनेवर बोट ठेवत बोपण्णाला संघातून वगळण्याचा निर्णय घेतला. 'आम्ही आमचे डोळे झाकले नाहीत, जर एखाद्या खेळाडूला देशासाठी खेळण्याची इच्छा नसेल तर त्याला संघात स्थान दिले जाणार नाही. महत्त्वाच्या प्रसंगी खेळाडूंनी देशासाठी सर्वस्व देण्याची गरज असताना दुखापतीचे कारण देऊन माघार घेणे चुकीचे आहे,'' असे अखिल भारतीय टेनिस संघटनेने म्हटले आहे.

बोपण्णाने मात्र आपल्या कृतीचे समर्थन करताना मी नाचू शकतो याचा अर्थ मी खेळण्यासाठी 100 टक्के तंदुरुस्त आहे असा होत नाही, असे सांगितले. तो म्हणाला, 'मला खरोखरच दुखापत झाली होती. मला चालता, पळता येत होते; परंतु जर सामन्यात 5 सेट खेळण्याची गरज भासली असती तर मी तंदुरुस्त नव्हतो. देशासाठी खेळण्याला मी नेहमीच प्राधान्य दिले आहे; परंतु डॉक्‍टरांच्या सल्ल्याचा मान राखणे आवश्‍यक होते.'' बोपण्णाने अखिल भारतीय टेनिस संघटनेच्या निवड पद्धतीवरसुद्धा प्रश्‍न उपस्थित केला आहे. तो म्हणाला, 'स्पेनने प्ले-ऑफ लढतीसाठीसुद्धा सर्वोत्तम संघाची निवड केली होती. विजेत्या संघांकडून या गोष्टी शिकण्यासारख्या असून, आपणही छोटे छोटे वाद बाजूला ठेवून सर्वोत्तम संघाची निवड करण्याची गरज आहे.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today : आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोने झाले महाग, चांदीतही २१०० रुपयांची वाढ; तुमच्या शहरातील आजचा भाव जाणून घ्या

Pune-Nashik Highway: पुणे-नाशिक महामार्ग १० तास ठप्प; मंचरमधील आंदोलनाचा फटका; वाहतूक कोंडीने प्रवाशांचे हाल..

Latest Marathi News Live Update : अमेरिकेत ७००० ड्रायव्हर्सवर बंदी, भारतावर परिणाम

Kolhapur Kalamba Jail : कोल्हापूरच्या कळंबा जेलमध्ये सापडली जिवंत काडतूसे, पुण्यातील आंदेकर टोळी कनेक्शन? सुरक्षा यंत्रणांना दिला चकवा

Pune School Controversy: शिस्तीच्या नावाखाली विद्यार्थ्यांचे कापले केस; स्वतंत्र शुल्क आकारल्याची माहिती

SCROLL FOR NEXT