Bajrang Punia MC Mary Kom And Manpreet Singh  E sakal
क्रीडा

Olympics : मेरी कोम-मनप्रीतसह पुनियाला ध्वजवाहकाचा मान

कुस्तीमध्ये पदकाचा प्रबळ दावेदार असलेल्या बजरंग पुनियालाही ध्वजवाहकाचा मान मिळालाय.

सुशांत जाधव

भारतीय ऑलम्पिक महासंघाने (IOA) जगातील मानाची स्पर्धा असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी (Tokyo Olympics ) ध्वजवाहकांची निवड केलीय. उद्घाटन समारंभावेळी ध्वजवाहकाचा मान हा भारताची दिग्गज बॉक्सर एमसी मेरी कोम आणि हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंह यांना मिळाला आहे. भारतीय ऑलिम्पिक महासंघाने याची घोषणा केली. 23 जैलैपासून सुरु होणाऱ्या स्पर्धेत मेरी कोम आणि मनप्रीत सिंह भारतीय खेळाडूंच्या पथकाचे नेतृत्व करताना दिसतील. कुस्तीमध्ये पदकाचा प्रबळ दावेदार असलेल्या बजरंग पुनियालाही ध्वजवाहकाचा मान मिळालाय. 8 ऑगस्ट रोजी समारोह कार्यक्रमात बजरंग पुनिया ध्वजवाहकाची भूमिका बजावताना दिसेल. (Boxer MC Mary Kom And Hockey Player Manpreet Singh to be flag bearers of Indian contingent at Tokyo Olympics opening ceremony)

ऑलिम्पिकच्या इतिहासात पहिल्यांदाच भारताकडून महिला आणि पुरुष गटातून दोन ध्वजावाहकांची नियुक्ती करण्यात आलीये. जगातील मानाच्या स्पर्धेच्या व्यासपीठावरुन स्त्री-पुरुष समानतेचा संदेश देण्यासाठी भारताकडून दोन ध्वजवाहकांची निवड करण्यात येणार असल्याची घोषणा यापूर्वीच आयओए प्रमुख नरिंदर बत्रा यांनी केली होती. 2016 च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत भारताकडून ऑलिम्पिक सुवर्ण पदक विजेता अभिनव बिंद्रा ध्वजवाहक म्हणून दिसला होता. कोरोनाच्या संकटामुळे टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा 1 वर्षांनी पुढे ढकलण्यात आली आहे. 23 जुलैपासून या स्पर्धेला सुरुवात होतेय. या स्पर्धेत भारताकडून 100 हून अधिक खेळाडू सहभागी होणार आहेत.

ऑलिम्पिकमध्ये बॉक्सिंगमध्ये भारताला पदक मिळवून देणारी मेरी कोम एकमेव महिला खेळाडू आहे. 2012 लंडन ऑलिम्पिक स्पर्धेत 51 किलो वजनी गटातील फ्लायवेट प्रकारात तिने कांस्य पदकाची कामाई केली होती. मेरी कोमच्या नावे वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक पदके मिळवण्याचा विक्रम आहे. मेरी कोमने या स्पर्धेत 6 सुवर्ण पदक, 1 रोप्य पदक आणि एक कांस्य पदक जिंकले आहे. पुरुष गटातील क्युबाचा बॉक्सर पेलिक्स सेवॉन याचा 7 पदकांचा विक्रम मेरी कॉमने मागे टाकला होता.

एमसी मेरी कोम हिने आशिया/ ओसनिया ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेतील सेमीफायनल गाठत ऑलिम्पिकचे तिकीट मिळवले होते. जागतिक बॉक्सिंग रँकिंगमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या मेरी कोमने क्वार्टरफायनलमध्ये फिलीपाईन्सची आयरिश मॅग्नोला 5-0 असे पराभूत केले होते. ती दुसऱ्यांदा ऑलिम्पिक स्पर्धेत सहभागी झाली असून तिच्याकडून पदकाची आशा आहे. ऑलिम्पिकमध्ये गोल्डन कामगिरी करुन कारकिर्दीला पूर्णविराम देण्यासाठी मेरी कोम उत्सुक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Flood : नेपाळ-तिबेट सीमेवर जलप्रलयाचा थरार! महाभयंकर विनाशादरम्यान आतापर्यंत काय-काय घडलं? जाणून घ्या

Nepal Flood : नेपाळमध्ये पुन्हा पुराचा धोका; तिबेटमध्ये धरण फुटल्याने अलर्ट

Who is Sonal Dinusha? भारताविरुद्ध दोन सामन्यात तीन शतकं ठोकणारा दिनूशा आहे तरी कोण? श्रीलंकेला सापडलाय हिरा

Marathi News Live Updates : नागपूरचे 106 जण अडकले नेपाळमध्ये; सर्वजण सुरक्षित; आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली महत्त्वाची अपडेट

Devgad Nuclear Project : देवगडमध्ये अणुऊर्जा प्रकल्प? नगरपंचायतीच्या सभेत प्रशासनाला विचारला जाब; 'या' मुद्द्यावरून गदारोळ

SCROLL FOR NEXT