boxer nikhat zareens reply to Neeraj Chopra
boxer nikhat zareens reply to Neeraj Chopra  
क्रीडा

नीरज चोप्राच्या ट्विटवर झरीनचे उत्तर व्हायरल; इस्तंबूलमध्ये झेंडा फडकवूनच ...

Kiran Mahanavar

भारतीय इतिहासात वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियन निखत झरीनने सुवर्णपदक जिंकून आपले मान अभिमानाने उंच केले आहे. इस्तंबूल येथे झालेल्या जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकल्यानंतर तिच्यासाठी सोशल मीडिया देशभरातून अभिनंदनाचे मेसेज येत आहेत. वर्ल्ड चॅम्पियन बनणारी निखत झरीन भारताची पाचवी महिला बॉक्सर बनली आहे. मायदेशी परतल्यावर तिचे भव्य स्वागत करण्यात आले. (nikhat zareens reply to Neeraj Chopra Congratulatory Message tweet viral)

निखत झरीनच्या विजयाचा आनंद अख्ख्या देशाने साजरा केला, आणि तिचे अभिनंदन केले. त्याच्या या उत्कृष्ट कामगिरीबद्दल भारताचा स्टार ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा याने पण ट्विट करत निखतचे अभिनंदन केले आहे. नीरज चोप्रा यांनी ट्विट मध्ये लिहिले आहे की, वर्ल्ड चॅम्पियन निखत झरीन तुझं खूप खूप अभिनंदन इस्तंबूलमध्ये झेंडा फडकवला आहे. निखत जरीन खंरच खूप छान! यावर निखतनेही आपल्या शैलीत सांगितले की, ऑलिम्पिक चॅम्पियन नीरज चोप्रा तुमचे खूप खूप आभार. मी झेंडा फडकवूनच येण्याचा विचार केला होता.

नीरज चोप्राचे ट्विट आणि निखत जरीनचा रिप्लाय चाहत्यांना खूप आवडले आणि आता व्हायरल होत आहेत. या ट्विटवर दोन्ही चॅम्पियन खेळाडूंना सातत्याने कमेंट्स येत आहेत. राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा या वर्षी होणार होत्या पण पुढे ढकलण्यात आलेल्या आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत दोन्ही खेळाडू परत भारताला सुवर्णपदक मिळवून देतील. अशी सर्व भारतीयांना अपेक्षा आहे. पॅरिस ऑलिम्पिक 2024 भारताकडून पदकांचे सर्वात मोठे दावेदार असतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT