brad hogg questions no dead ball given after virat kohli
brad hogg questions no dead ball given after virat kohli  sakal
क्रीडा

India vs Pakistan : ब्रँड हॉगला आला पाकचा पुळका; मात्र नियम वेगळेच काही सांगतोय भाऊ

Kiran Mahanavar

India vs Pakistan Brad Hogg : टी-20 विश्वचषकात भारताने सुपर-12 सामन्यात पाकिस्तानचा चार विकेट राखून पराभव केला. या सामन्याच्या शेवटच्या षटकात असे काही घडले ज्याची सतत चर्चा होत आहे. मोहम्मद नवाजने शेवटच्या षटकात एक फुल टॉस टाकला ज्याला अंपायरने नो-बॉल दिला. यानंतर विराट कोहली फ्री हिटवर क्लीन बोल्ड झाला, पण कोहलीने तीन धावा घेतल्या. ऑस्ट्रेलियाचा माजी क्रिकेटपटू ब्रॅड हॉगने यावर प्रश्न उपस्थित केला आहे.

विराट कोहलीने या सामन्यात अप्रतिम खेळी खेळली आणि 53 चेंडूत 82 धावा केल्या. त्याने हार्दिक पांड्यासोबत भारतीय संघाला विजयापर्यंत नेले. मात्र यानंतर ऑस्ट्रेलियाचा दिग्गज हॉगने एक फोटो ट्विटरवर शेअर करत लिहिले की, "नो-बॉलचा रिव्यू का केला गेला नाही आणि नंतर कोहली फ्री हिटवर क्लीन बोल्ड झाला तेव्हा त्याला डेड बॉल का दिला गेला नाही."

नियम काय आहेत?

क्रिकेटच्या नियमानुसार फ्री हिटवर जे झाले ते अगदी बरोबर आहे. फ्री हिटसाठी बनवलेल्या नियमांनुसार या चेंडूवर फलंदाज धावबाद होऊ शकतो. चेंडू फ्री हिट असल्याने, क्लीन बॉलिंग करताना चेंडू डॉट नसतो, परंतु त्यावर काढलेल्या धावांना बाय म्हणून दिले जातो. जर चेंडू स्टंपला लागला आणि सीमारेषा ओलांडली तर संघाच्या खात्यात चार अतिरिक्त धावा जमा होतात.

  • 19.1 : हार्दिक पंड्या उंच फटका मारण्याच्या प्रयत्नात झेल देऊन बाद

  • 19.2 : (5 चेंडूंत 16 धावांची गरज) : फलंदाजीस आलेल्या कार्तिककडून एक धाव

  • 19.3 : कोहलीकडून दोन धावा

  • 19.4 : कोहलीच्या कंबरेच्या वर चेंडू, त्यामुळे नो-बॉल आणि विराटकडून षटकार (एकूण सात धावा) त्यामुळे फ्री-हीट (आता 3 चेंडूत 6 धावांची गरज)

  • 19.4 : वाईड चेंडू (फ्री-हीट कायम) (आता 3 चेंडूंत 5५ धावांची गरज)

    फ्री-हीट असलेला हा चेंडू विराटच्या यष्टींवर लागला, पण 'थर्ड मॅन'च्या दिशेने गेल्यामुळे विराट-कार्तिककडून धावून तीन धावा (2 चेंडूंत 2 धावांची गरज)

  • 19.5 : कार्तिक यष्टिचीत (अश्विन फलंदाजीस) (एक चेंडू दोन धावांची गरज)

  • 19.6 : नवाझकडून जाणीवपूर्वक लेगसाईडला टप्पा, त्यामुळे वाईड चेंडू, अश्विनने हे अगोदरच ओळखले, त्यामुळे खेळण्याचा प्रयत्न नाही. वाईड चेंडूची एक धाव मिळाली.

  • 19.6 : (एक चेंडू एका धावेची गरज) अश्विनने कल्पकपणे चेंडू मिडऑफच्या डोक्यावरून मारला आणि भारताचा विजय साकारला.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chhagan Bhujbal: "काँग्रेस मला मुख्यमंत्रीपद देण्यास तयार होती, मात्र मी..."; भुजबळांची शरद पवारांच्या गौप्यस्फोटावर प्रतिक्रिया

Anil Kapoor : "सहजीवनाची 51 वर्षं..."; लग्नाच्या वाढदिवसाला अनिल यांची पत्नीसाठी इमोशनल पोस्ट

Soni Razdan: आलिया भट्टच्या आईसोबत फसवणुकीचा प्रयत्न; म्हणाल्या, "त्यांनी मला फोन केला आणि..."

RCB vs CSK : आरसीबीपाठोपाठ जिओ सिनेमाचीही बल्ले-बल्ले, मिळाली छप्पर फाड के व्ह्युवरशिप; सगळे रेकॉर्ड ब्रेक

गोफण | 'बिनशर्त'ची सुपारी दणक्यात वाजली!

SCROLL FOR NEXT