Brazil crush South Korea sakal
क्रीडा

FIFA World Cup22: ब्राझीलचा धडाकेबाज विजय! कोरियावर मात करीत थाटात उपउपांत्य फेरीत

स्ट्रायकर नेमार संघात परतल्यानंतर बळ मिळालेल्या बलाढ्य ब्राझीलने दक्षिण कोरियावर धडाकेबाज विजय मिळविला

सकाळ ऑनलाईन टीम

FIFA World Cup 2022 : स्ट्रायकर नेमार संघात परतल्यानंतर बळ मिळालेल्या बलाढ्य ब्राझीलने आज दक्षिण कोरियावर ४-१ असा धडाकेबाज विजय मिळविला आणि विश्वकरंडक स्पर्धेच्या उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. तेथे त्यांची लढत क्रोएशियाशी होईल. ब्राझीलने चारही गोल पूर्वार्धातच केले आणि कोरियाच्या आव्हानातील हवाच काढून घेतली. यामुळे जपाननंतर दुसरा आशियाई संघही स्पर्धेबाहेर गेला आहे. कोरियाने तुलनेत उत्तरार्धात चांगला प्रतिकार करून एक गोलही केला.

ब्राझीलच्या गोल धडाक्याची सुरुवात सातव्या मिनिटापासून सुरू झाली. ब्राझील कोरियाच्या डीच्याजवळ होते. यावेळी राफीन्हाने नेमारकडे पास दिला. नेमार डीमध्ये मध्यभागी होता. चेंडू त्याच्या पुढ्यातून डाव्या बगलेतील विनिशियस ज्युनिअरच्या पायात आला. त्याने हलकासा टच केला. क्षणभर थांबून अंदाज घेत झटकन गोल पोस्टच्या डाव्या कॉर्नरमध्ये सहजरित्या धाडला.

तेराव्या मिनिटाला ब्राझीलला पेनल्टी मिळाली. ही संधी नेमारने साधत आघाडी २-० अशी केली. कोरिया गोलची संधी शोधत होता. पुढे २९ व्या मिनिटाला रिचर्लिसन याने अफलातून गोल करीत आघाडी ३-० अशी केली. हा सांघिक गोल खास ब्राझील शैलीतील होता. रिचर्लिसनने हेड करीत चेंडू मार्किनहोसकडे दिला. त्याने कासेमिराकडे सोपविला. त्याने हलकासा पास देत रिचर्लिसनकडे दिला. झटपट पासिंगमुळे कोरियाची संरक्षक फळी काहीशी विस्कळीत झाली. त्याचा फायदा उठवत रिचर्लिसनने चेंडू गोल जाळ्यात धाडला.

ब्राझीलच्या चाहत्यांनी या गोलवर एकच जल्लोष केला. ३६ व्या मिनिटाला पक्वेटाने एक अफलातून गोल करीत पूर्वार्धातच ब्राझीलची आघाडी ४-० अशी निर्णायकी केली. खोलवर मिळालेला पास घेऊन रिचर्लिसन डीच्या दिशेने निघाला. त्याने नेमारकडे चेंडू टोलविला. त्याने विनिशियसकडे दिला. त्याने क्रॉस टाकत चेंडू पक्वेटाकडे दिला. त्याने क्षणार्धात चेंडूला दिशा देत चौथा गोल साकारला. कोरियाकडून फाईक सेऊंग हो याने ७६ व्या मिनिटाला गोल केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Fadnavis: मुख्यमंत्र्यांसमोर शस्त्र ठेवून माओवादी नेता भूपती शरण येणार? ६० सहकाऱ्यांसह शरणागती, १० कोटींचं होतं बक्षीस

Bomb Threat: मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांना ई-मेलद्वारे बॉम्बस्फोटाची धमकी; तमिळनाडू कनेक्शन?

Latest Marathi News Live Update: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी वाचा एका क्लिकवर...

PMC Election : महापालिका निवडणुकीच्या मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर; ६ नोव्हेंबरला प्रारूप तर १० डिसेंबरला अंतिम मतदार यादी जाहीर होणार

Ajinkya Rahane: 5-6 वर्षांपूर्वी निवृत्त झालेल्या खेळाडूंनी निवड समितीत असावं, नाहीतर...; रहाणेचा रोख कोणाकडे?

SCROLL FOR NEXT