क्रीडा

Pele hospitalized: दिग्गज फुटबॉलपटू पेले यांची प्रकृती चिंताजनक, मुलाने शेअर केला फोटो

सकाळ डिजिटल टीम

फुटबॉलमधील सर्वकालीन महान पेले यांची प्रकृती चिंताजनक आहे. ब्राझीलचा महान फुटबॉलपटू पेले हे सध्या साओ पाउलोच्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहेत. त्यांना विशेष निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सतत्याने खालावत चालली आहे

कर्करोगाशी झुंज देत असलेले ब्राझीलचे महान फुटबॉलपटू पेले यांच्या प्रकृतीत सुधारणा होत नाहीये. त्यांना साओ पाउलो येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पेले यांनी नाताळ सण देखील रुग्णालयातच साजरा केला. त्यांची प्रकृती पाहता नातेवाईकांनी रुग्णालयात धाव घेण्यास सुरुवात केली आहे. पेले यांची प्रकृती सातत्याने खालावत चालली असून, त्यांच्या किडनी आणि हृदयावर परिणाम होत आहे.

रुग्णालयाने दिलेल्या माहितीनुसार, 82 वर्षीय माजी फुटबॉलपटू पेले यांची विशेष काळजी घेण्यात येत आहे. पेले यांचा मुलगा एडसन चोल्बी नॅसिमेंटो शनिवारी रुग्णालयात दाखल झाला, अशी माहिती एपी वृत्तसंस्थेने दिली. पेले यांची मुलगी केली नॅसिमेंटोही रुग्णालयात आहे. पेलेच्या मुलाने इंस्टाग्रामवर एक भावनिक पोस्ट पोस्ट केली, ज्यामध्ये त्याने, "पापा... माझी ताकद तुम्ही आहात." असं लिहीलं आहे.

हेही वाचा- Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

पेले यांना रुटीन चेकअपसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले, पण हळूहळू त्यांची प्रकृती ढासळू लागली. ते अजून बाहेर आलेले नाहीत. पेले यांना हृदयविकाराचा त्रास होता. त्याच्या केमोथेरपी उपचारांना चांगला प्रतिसाद मिळत नसल्याने त्याच्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी चिंता व्यक्त केली. सप्टेंबर 2021 मध्ये त्यांची कोलन ट्यूमर काढण्यात आली. त्यानंतर त्यांची केमोथेरपी झाली. पेले यांना यापूर्वीही अनेकदा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.

ब्राझीलला तीन वेळा बनवलं चॅम्पियन

पेलेने आपला देश ब्राझीलला तीन वेळा वर्ल्ड चॅम्पियन बनवले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली ब्राझीलने 1958, 1962 आणि 1970 मध्ये विश्वचषक जिंकला होता. 1958 च्या विश्वचषक फायनलमध्ये सुदान विरुद्ध दोन गोल केले. पेलेन यांनी आपल्या व्यावसायिक कारकिर्दीत एकूण 1363 सामने खेळले आणि 1281 गोल केले. त्यांनी ब्राझीलसाठी 91 सामन्यात 77 गोल केले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raigad News: कोकणवासीयांचा परतीचा प्रवास सुरू! एसटीला पसंती, बसस्थानकांवर प्रचंड गर्दी

Rohit Sharma: One Last Time! रोहितने सिडनीतून केलं ऑस्ट्रेलियाला अलविदा, सोशल मीडिया पोस्ट व्हायरल

Latest Marathi News Live Update : लासलगावला डम्पिंग ग्राउंडच्या समस्येतून दिलासा

Chhattisgarh Naxalite Surrender : छत्तीसगडमध्ये या वर्षांत तब्बल दोन हजारांहून अधिक नक्षलवाद्यांनी केलं आत्मसमर्पण!

Fraud Case: एपीएमसीत विमा फसवणूक प्रकरण उघड! नावसाधर्म्याचा गैरफायदा घेऊन पॉलिसी रक्कम लाटली

SCROLL FOR NEXT