Fitness Influencer Cardiac Arrest  ESAKAL
क्रीडा

Fitness Influencer Cardiac Arrest : फिटनेस इन्फ्लुएन्सरला दोन वेळा आला हार्ट अटॅक; अवघ्या 33 व्या वर्षी Larissa Borges चं निधन

अनिरुद्ध संकपाळ

Fitness Influencer Cardiac Arrest : ब्राझीलची तरूण फिटनेस इन्फ्लुएन्सर लारिसा बोर्जचे अवघ्या 33 व्या वर्षी दोनवेळा हार्ट अटॅक आल्यामुळे निधन झाले. लारिसावर आठवड्याभरापासून न्यूयॉर्कच्या रूग्णालयात उपचार सुरू होते. तिच्या कुटुंबियांनी तिच्या इन्स्टाग्राम पेजवरून लारिसाच्या निधनाची माहिती दिली. 'फक्त 33 व्या वर्षी कोणाला तरी गमावणं हे खूप वेदनादायी असते. ही ह्रदयद्रावक घटना आहे.' अशा भावना त्यांनी व्यक्त केली.

स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार फिटनेस इन्फ्लुएन्सर बॉर्जेसला ग्रामाडो येथे जात असताना 20 ऑगस्ट रोजी हार्ट अटॅक अल्याने रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर ती कोमामध्ये गेली होती. तिला दुसरा हार्ट अटॅक आला आणि त्यानंतर तिचा मृत्यू झाला.

बॉर्जेसचा मृत्यू कशामुळे झाला हे अजून उघड झालेले नाही. मात्र प्राथमिक तपासात ज्यावेळी तिला हार्ट अटॅक आला त्यावेळी ती नशेत होती. तिचा मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.

गुस्टावो बार्सेलोसमधील डेप्युटींनी तपास सुरू असल्याचे सांगितले. ते म्हणाले 'मिळालेल्या माहितीनुसार तिच्या शरिरात ड्रग्स गेल्याची शक्यता आहे. याच्या जोडीला मद्य देखील शरिरात गेल्याची शक्यता आहे. मृतदेह पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. तिने कोणत्या गोष्टीचे सेवन केले होते हे आम्ही प्रयोगशाळेतील तपासातून शोधून काढू.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Cylinder Price Hike : सणासुदीच्या तोंडावर महागाईचा झटका! कमर्शियल LPG सिलिंडरच्या दरात मोठी वाढ, जाणून घ्या तुमच्या शहरातील ताजे दर

Nuchinunde Recipe: इडली-वडा तर नेहमीच खाता; ट्राय करा कर्नाटकचं स्पेशल, प्रोटीनने भरपूर 'नुचिनुंडे'!

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

SCROLL FOR NEXT