breach of contract virat kohli instagram story angers bcci bosses india cricketers get verbal warning report Sakal
क्रीडा

Virat Kohli : बीसीसीआयची विराट कोहलीला तंबी; सोशल मीडियावर केलेली पोस्ट पडली महागात

आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाचे सराव शिबिर बंगळूरमध्ये सुरू झाले

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : तंदुरुस्तीबाबत अतिशय जागरुक असलेला आणि जवळपास आपल्या जिममधील व्यायामाचे जवळपास सर्व अपडेट सोशल मीडियावर देत असलेल्या विराट कोहलीला काल प्रसिद्ध केलेली पोस्ट महागात पडली. त्यासाठी बीसीसीआयने त्याला तंबी दिली आहे.

आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी भारतीय संघाचे सराव शिबिर बंगळूरमध्ये सुरू झाले आहे. तंदुरुस्तीसाठी यो यो चाचणी बंधनकारक करण्यात आली आहे. तंदुरुस्त आणि चपळ असलेल्या विराटने यो यो चाचणी सहजच पार केली आणि १७.२ अशी सर्वोत्तम कामगिरी केली. त्याने लगेचच स्वतःच्या फोटोसह या कामगिरीची माहिती सोशल मीडियावर देत प्रसिद्ध केली.

पण बीसीसीआयला विराटची ही कृती आवडली नाही. यो यो चाचणीत कोणी किती स्कोअर केला किंवा कामगिरी केली, ही गोपनीय बाब आहे, ती जाहीर करणे योग्य नाही. तुम्ही सरावातील छायाचित्र पोस्ट करू शकता; परंतु अशी माहिती उघड करणे चुकीचे आहे, असे बीसीसीआयने विराटला सुनावले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Parel-Chinchpokli: ईद-मिलादच्या मिरवणुकीदरम्यान राडा! धक्काबुक्की, दगडफेक अन् धार्मिक घोषणाबाजी; परळ-चिंचपोकळीत तणाव, Video Viral

Jayant Patil BJP Entry : जयंत पाटील भाजपात जाणार?, ४५ वर्षे खांद्याला खांदा देणाऱ्या दिलीप तात्यांच्या वाढदिवस कार्यक्रमात केला खुलासा

Girish Mahajan: ‘तुमचे घोडे नेमके कुठे अडले, मला कळत नाही’; सावळीविहीर रस्त्याच्या प्रश्नावर गिरीश महाजन आक्रमक

Marathi News Live Updates : अंबाबाई मंदिर परिसरातील रस्त्यांची चाळण, खड्ड्यांत शिवसैनिक लावणार झाडे

Pune University: पेपरफुटी, भ्रष्ट व्यवस्थेविरोधात मोठा लढा; ‘आयसा’चा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT