Brij Bhushan Singh  SAKAL
क्रीडा

Brij Bhushan Singh: ब्रिजभूषण यांची धाकधुक वाढली! कुस्तीपटूंवरील लैंगिक छळ प्रकरणी न्यायालयाने निर्णय ठेवला राखून

Kiran Mahanavar

Brij Bhushan Singh : महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाचा आरोप असलेले भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण शरण सिंह यांनी गुरुवारी दिल्लीतील राऊस अव्हेन्यू न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला आहे.

राऊस एव्हेन्यू कोर्टाने ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या नियमित जामीन याचिकेवरील आदेश दुपारी 4 वाजेपर्यंत राखून ठेवला आहे. दरम्यान, न्यायालयाने दिल्ली पोलिसांच्या वकिलाने सांगितले की, ते जामीन अर्जाला विरोध किंवा समर्थन करत नाही, ते फक्त असे म्हणत आहे की कायद्याच्या तरतुदीनुसार त्यावर काय तरी अ‍ॅक्शन घेतली पाहिजे.

याआधी मंगळवारी म्हणजेच 18 जुलै रोजी ब्रिजभूषण शरण सिंह यांना कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषण प्रकरणात दिलासा मिळाला होता. राऊस अव्हेन्यू कोर्टाने मंगळवारी ब्रिजभूषण आणि त्यांचे सहआरोपी विनोद तोमर यांना दोन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर केला. या वेळी ब्रिजभूषण कडक पोलीस बंदोबस्तात न्यायालयात हजर झाले होते. आता आज 20 जुलै रोजी आरोपींच्या नियमित जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

मागील सुनावणीदरम्यान अतिरिक्त मुख्य महानगर मजिस्ट्रेट हरजीत सिंग जसपाल यांच्या न्यायालयाने सांगितले होते की, या प्रकरणाच्या पुढील सुनावणीदरम्यान नियमित जामीन अर्जावर युक्तिवाद केल्यानंतर निर्णय घेतला जाईल. आरोपींविरुद्ध दाखल झालेल्या आरोपपत्राची दखल घेत न्यायालयाने त्यांना 7 जुलै रोजी समन्स बजावून हजर राहण्याचे आदेश दिले होते.

ब्रिजभूषण यांच्या वकिलाने न्यायालयाला सांगितले होते की, हे अटकाविना आरोपपत्र आहे. यावर जामीन अर्ज दाखल करण्यात आला आहे. दिल्ली पोलिसांच्या वतीने सरकारी वकील अतुल श्रीवास्तव हजर झाले. कोर्टाने विचारले की, जामिनासाठी तुमचा युक्तिवाद काय आहे? दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण यांना अटक केली नसल्याचे सांगितले होते.

ब्रिजभूषण यांचे वकील राजीव मोहन यांनी युक्तिवाद केला की या प्रकरणात पोलिसांनी लावलेल्या कोणत्याही कलमात पाच वर्षांपेक्षा जास्त शिक्षेची तरतूद नाही. दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण सिंह यांच्या जामिनाला विरोध केला आहे, कारण तो बाहेर जाऊन साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhya Pradesh Congress: मध्य प्रदेशच्या राजकारणात खळबळ! कमलनाथ यांनी केला गौप्यस्फोट, म्हणाले..

Mohol News : शेततळ्यात पाय घसरून पडून विवाहितेचा मृत्यू

Latest Marathi News Updates: वेळ पडली तर गेवराईतून निवडणुकीला उभं राहणार- हाके

गणेशोत्सव निर्विघ्न पार पडण्यासाठी पोलिसांचा अ‍ॅक्शन मोड, प्रत्येक घडामोडीवर करडी नजर; 'असा' असेल प्लॅन

Maratha Reservation : मुंबई आंदोलनासाठी मंगळवेढ्यातून तिघांची सायकलवारी

SCROLL FOR NEXT