Brij Bhushan Sharan Singh  esakal
क्रीडा

Brij Bhushan Sharan Singh: पुढील सुनावणीपर्यंत ब्रिजभूषण यांना अंतरिम जामीन मंजूर

Sandip Kapde

Brij Bhushan Sharan Singh:  भारतीय कुस्ती महासंघाचे (WFI) माजी प्रमुख आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह आणि विनोद तोमर यांच्या नियमित जामिनावर 20 जुलै रोजी सुनावणी होणार आहे. पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत त्यांना अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे.

ब्रिजभूषण शरण सिंह यांची बाजू मांडताना त्यांचा वकिलाने सांगितले की, आरोपपत्र दाखल होईपर्यंत ब्रिजभूषण यांना अटक करण्यात आली नाही, याचा अर्थ असा आहे की त्यांच्याविरुद्ध असे कोणतेही पुरावे किंवा दावे नाहीत. (latest marathi news)

कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या आरोपात दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. ब्रिजभूषण स्वत: न्यायालयात हजर झाले होते. यावेळी त्यांचे घर आणि न्यायालयाबाहेर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

आता 20 जुलै रोजी कोर्टात नियमित जामिनावर सुनावणी होणार आहे. त्याचा निर्णय येईपर्यंत ब्रिजभूषण अंतरिम जामिनावर राहणार आहेत.

ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यासोबतच त्यांच्या जवळचे आणि कुस्ती महासंघाचे पदाधिकारी विनोद तोमर यांनाही अंतरिम जामीन मिळाला आहे. त्यांना 6 पैकी 2 प्रकरणांमध्ये आरोपी देखील करण्यात आले आहे. त्यांना ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यासह सहआरोपी करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs AFG: वैभव सूर्यवंशी की संजू सॅमसन, कोणाला मिळणार संधी? कर्णधार श्रेयस अय्यरने दिले उत्तर; ईशान किशनच्या दुखापतीवरही अपडेट

Machnur Siddheshwar Temple : माचणूरच्या सिद्धेश्वर मंदिरात प्रणिती शिंदेंकडून भाविकांची सेवा; ५ कोटी ४ लाखांच्या विकासकामांचा आढावा

शनीची वक्री असणं फायदेशीर! 'या' ४ राशींचं नशीब चमकणार; पैशांसह करिअरमध्ये मोठा फायदा

मी अजून लग्न केलेलं नाही...!; राष्ट्रपतींचे ADC राहिलेल्या मेजर ऋषभ सिंह सांब्याल यांनी सांगितलं कारण, म्हणाले, ''नियमानुसार...''

Kolhapur Madhuri Elephant: 'माधुरी' हत्तीणीबाबत 'वनतारा'चे प्रसिद्धीपत्रक! बांधिलकीपोटी भविष्यातही देखभाल करण्याचा शब्द

SCROLL FOR NEXT