Wrestlers Protest brij bhushan sharan singh 
क्रीडा

Wrestlers Protest: पहिलवान आंदोलन करणार नाहीत हे कळल्यावर बृजभूषण सिंह हसले? पहा व्हायरल व्हिडिओ

Kiran Mahanavar

Wrestlers Protest : गेल्या सहा महिन्यांपासून देशातील कुस्तीपटू भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरुद्ध आंदोलन करत आहेत. ऑलिम्पिक पदक विजेते बजरंग पुनिया, साक्षी मलिक आणि विनेश फोगट यांनी जंतरमंतरवर महिनाभराहून अधिक काळ आंदोलन केले.

आतापर्यंत रस्त्यावर आंदोलन करून हा लढा लढला जात होता, पण आता ही लढत कोर्टातच लढली जाईल, असा निर्धार पैलवानांनी केला आहे. यावर आता ब्रिजभूषण सिंह यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

हा प्रश्न जेव्हा ब्रिजभूषण सिंह यांना कुस्तीपटूंना विचारण्यात आला तेव्हा ते हसायला लागले. ब्रिजभूषण म्हणाले, 'यात अडचण काय आहे. आता हे प्रकरण न्यायालयात आहे. मला काही बोलायचे नाही कारण आता हे प्रकरण न्यायालयात आहे. आता सर्व काही ठीक होईल असे वाटत असल्याचे भाजप खासदाराला सांगण्यात आले तेव्हा ते हसू लागले. यानंतर 'न्यायालय आपले काम करेल' असे म्हटल्यानंतर दिल्ली पोलिसांनी ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे.

विनेश फोगट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी ट्विट करून ही माहिती दिली. ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर आरोपपत्र दाखल करण्याचे आश्वासन सरकारने पूर्ण केले आहे, असे ते म्हणाले. अशावेळी पैलवानांची लढत रस्त्यावर न जाता कोर्टात सुरू राहणार आहे.

रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या निवडणुका अनेक वेळा लांबल्या आहेत. आसाम कुस्ती संघटनेच्या याचिकेवर गुवाहाटी उच्च न्यायालयाने रविवारी पुन्हा एकदा 11 जुलै रोजी होणाऱ्या निवडणुकांना स्थगिती दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Gram Panchayat: राज्यात आडाचीवाडी ग्रामपंचायत प्रथम; पुणे जिल्हा परिषदेला दुसरा क्रमांक, मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान

२०२३मध्ये IPS बनलेल्या ३० वर्षीय अधिकाऱ्याचा राजीनामा; लव्ह मॅरेजनंतर महाराष्ट्र केडरला केलेली बदली

Maharashtra Live News : मुंबईत सीजेपीच्या आंदोलनावर पोलिसांची धरपकड

HARDIK PANDYA BIRTHDAY: हार्दिक पांड्या ऑलराउंडर कसा बनला? गर्लफ्रेंड माहिका शर्माने सांगितला आजवर कधीही न ऐकलेला किस्सा!

Palghar Crime: पालघरमध्ये ६१ वर्षीय महिलेची हत्या; घरातील सामान अस्ताव्यस्त, चोरीच्या उद्देशाचा संशय

SCROLL FOR NEXT