Brij Bhushan Sharan Singh esakal
क्रीडा

Brij Bhushan Sharan Singh : सरकारच्या चौकशी समितीने... दिल्ली पोलिसांनी बृजभूषण प्रकरणात दिली महत्वाची माहिती

अनिरुद्ध संकपाळ

Brij Bhushan Sharan Singh : भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण शरण सिंह यांच्याबद्दल दिल्ली पोलिसांनी आज (दि. 16) न्यायालयात (सिटी कोर्ट) एक महत्वाची माहिती सादर केली. दिल्ली पोलिसांनी न्यायालयाला सांगितले की, केंद्र सरकारने नेमलेल्या निरीक्षण समितीने बृजभूषण यांना महिला कुस्तीपटूंनी केलेल्या लैंगिक छळाच्या आरोपातून निर्दोष ठरवले नव्हते.

सरकारी वकिलांनी न्यायालयात सांगितले की, 'निरीक्षण समितीने बृजभूषण शरण सिंह यांना निर्दोष ठरवले नव्हते. समितीने काही शिफारशी केल्या होत्या निर्णय दिला नव्हता.'

केंद्रीय क्रीडा मंत्रालयाने बृजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्धच्या आरोपांबाबतची शहानिशा करण्यासाठी एक निरीक्षण समिती नेमली होती. या समितीचे अध्यक्षपद भारताची बॉक्सर एम. सी. मेरी कोमकडे होते. या समितीने बृजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध झालेल्या लैंगिक छळाचे आरोपांची चौकशी केली.

या चौकशी समितीचा अहवाल सार्वजनिक करण्यात आला नाही. मात्र याची एक प्रत दिल्ली पोलिसांना देण्यात आली होती. सध्या ते बृजभूषण यांच्याविरूद्धच्या आरोपांची चौकशी करत आहेत. दिल्ली पोलीस आता 23 सप्टेंबरला बृजभूषण यांच्यावरील चार्जशिटवर आपला युक्तीवाद करणार आहेत.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT