Brij Bhushan Sharan Singh Wrestler Protest
Brij Bhushan Sharan Singh Wrestler Protest esakal
क्रीडा

Brij Bhushan Singh : ब्रिजभूषण यांच्या चौकशीवरून जागतिक कुस्ती संघटना नाराज

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारतातील कुस्तीपटूंनी राष्ट्रीय कुस्ती संघटनेचे माजी अध्यक्ष ब्रिजभूषण सिंहविरोधात केलेले आंदोलन अद्याप कायम आहे. कुस्तीपटूंनी मंगळवारी आपण मिळवलेली पदके गंगा नदीत सोडण्याचेही पाऊल उचलले. लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आलेल्या ब्रिजभूषण यांना तुरुंगात टाकण्याची मागणी कुस्तीपटू करीत आहेत;

पण केंद्रीय यंत्रणेकडून कोणतेही पाऊल उचलण्यात आलेले नसल्यामुळे कुस्तीपटू मागे हटण्यास तयार नाहीत. या प्रकरणाचा फटका भारतीय कुस्ती संघटनेला बसण्याची दाट शक्यता आहे. जागतिक कुस्ती संघटना ब्रिजभूषण यांच्याविरोधात होत असलेल्या चौकशीवरून नाराज आहे. तसेच त्यांच्याकडून भारतीय कुस्ती संघटनेला तंबी देण्यात आली आहे. आगामी ४५ दिवसांत नव्याने निवडणुका घेतल्या नाही, तर निलंबनाच्या शिक्षेला त्यांना सामोरे जावे लागणार आहे.

भारतीय कुस्तीपटू अनेक दिवसांपासून ब्रिजभूषण यांच्याविरोधात आंदोलन करीत आहेत. भारतातील केंद्रीय यंत्रणेकडून म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नाही. कुस्तीपटूंना जी वागणूक दिली जात आहे, तीही अयोग्य आहे. या प्रकरणाच्या चौकशीमध्येही पारदर्शकता दिसून येत नाही, अशी टीका जागतिक कुस्ती संघटनेकडून याप्रसंगी करण्यात आली आहे.

त्रयस्थ झेंड्याखाली खेळावे लागेल

लवकरात लवकर निवडणूक घेतली नाही, तर निलंबनाच्या शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे. अशा परिस्थितीत भारतीय खेळाडूंना त्रयस्थ झेंड्याखाली आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये खेळावे लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RR vs PBKS : राजस्थान आज प्ले ऑफमध्ये जाणार की पंजाब देणार पराभवाचा धक्का... प्रीती झिंटाच्या संघाचा कर्णधार कोण?

RBI Monetary Policy: महागाईमुळे RBIची चिंता वाढली; तुमचा EMI कमी होणार का?

माधवी राजे शिंदे काळाच्या पडद्याआड! केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य यांना मातृशोक, दिल्लीपासून मध्य प्रदेशात शोककळा

Nagpur Crime : कुलर कंपनीच्या मालकाची २० लाखांची फसवणूक ; व्यवस्थापकाने बनावट कुलर बनवून विकले

Praful Patel : जिरेटोपावरुन प्रफुल्ल पटेल यांचं स्पष्टीकरण; म्हणाले, अशी कोणतीही गोष्ट मनात...

SCROLL FOR NEXT