IND vs ENG 1st Test esakal
क्रीडा

IND vs ENG 1st Test : ब्रिटीश नागरिकांना... शोएब बशिरसाठी पंतप्रधान ऋषी सुनक मैदानात

शोएब बशिर व्हिसा प्रकरणात ऋषी सुनक यांच्या प्रवक्त्याने बीसीसीला दिला प्रतिक्रिया

अनिरुद्ध संकपाळ

IND vs ENG 1st Test Rishi Sunak : भारत आणि इंग्लंड यांच्यातील कसोटी मालिकेदरम्यान इंग्लंडचा युवा खेळाडू शोएब बशिरच्या व्हिसाबाबत गोंधळ निर्माण झाला. पाकिस्तानी मूळ असणाऱ्या शोएब बशिरची इंग्लंड संघात रिप्लेसमेंट म्हणून निवड झाली. मात्र हैदराबाद येथील पहिल्या कसोटीपूर्वी 20 वर्षाच्या बशिरला व्हिसा बाबत निर्माण झालेली अडचण सोडवण्यासाठी मायदेशात परतावे लागले. तो अबू धाबीतून भारतात दाखल होणार होता.

यानंतर इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने बशिरच्या व्हिसाबाबत निर्माण झालेल्या अडणीवर नाराजी व्यक्त केली होती. भारताचा कर्णधार रोहित शर्मा देखील बशिरच्या व्हिसाबाबत झालेला गोंधळ लवकरात लवकर संपावा अशी अपेक्षा बोलून दाखवली. आता या वादात ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांनी उडी घेतली आहे.

ऋषी सुनक यांच्या प्रवक्त्यांनी बीबीसीला प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, 'मी फक्त या प्रकरणाबाबत बोलत नाहीये. ढोबळमानाने सांगायचं झालं तर आम्ही अशा प्रकारचे विषय यापूर्वीच उच्चायुक्तालयाकडे मांडले आहे. आम्ही स्पष्टपणे भारताला सांगितले आहे की प्रत्येकवेळी ब्रिटीश नागरिकांच्या व्हिसाबाबत योग्य वागणूक मिळाली पाहिजे.'

'आम्हाला पाकिस्तानी मूळ असलेल्या ब्रिटीश नागरिंकाबाबत असे अनुभव मागे देखील आले होते. त्यावेळी आम्ही हा मुद्दा मांडला होता. आम्ही अशा नागरिकांना व्हिसा संदर्भातील येत असलेल्या समस्यांबाबत लंडनमधील भारताच्या उच्चायुक्तालयात मुद्दा मांडला होता.'

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

संसदेच्या पावसाळी अधिवेशनात १४ विधेयकं मांडली, १२ मंजूर; चर्चेच्या वेळेत अन् प्रश्नोत्तरात कामकाज नापास

'हा' प्रसिद्ध राजकीय नेता अभिनेत्रीला करायचा अश्लिल मॅसेज, म्हणायचा..'हॉटेलवर चल' अभिनेत्रीने केला धक्कादायक अनुभव शेअर

बेस्ट पतपेढीत एकही जागा नाही, राज ठाकरे म्हणाले,'मला माहितीच नाही विषय, छोटी गोष्ट आहे रे'

'सावरखेड एक गाव' फेम अभिनेत्रीची छोट्या पडद्यावर दणक्यात एंट्री; 'स्टार प्रवाहच्या 'या' मालिकेत साकारणार भूमिका

माझ्या मुलाने आणखी काय करायला हवं? श्रेयस अय्यरला Asia Cup 2025 संघात संधी नाही मिळाली; वडिलांना राग अनावर

SCROLL FOR NEXT