ishant.jpg 
क्रीडा

INDvsWI : बुमरा म्हणाला, क्रॉस सीम कर अन् मग.. : ईशांत शर्मा

वृत्तसंस्था

अँटिग्वा : वेस्ट इंडीज विरुद्ध भारत संघातील पहिला कसोटी सामना भारताने 318 धावांनी जिंकला. या सामन्यात इशांतने अप्रतिम गोलंदाजी केली. त्याने पहिल्या डावात 5 विकेट्स व दुसर्या डावात 3 विकेट घेतल्या. दरम्यान, यावेळी गोलंदाजी करताना त्याला जसप्रीत बुमराहने चेंडू क्रॉस सीम करण्यास सांगितले होते. त्यामुळे गोलंदाजी करताना मदत झाल्याचे इशांतने क्षेत्ररक्षक प्रशिक्षक आर श्रीधर यांनी घेतलेल्या मुलाखतीत सांगितले आहे. 

ही मुलाखत बीसीसीआयने अधिकृत वेबसाईटवर शेअर केली आहे. इशांत त्याच्या गोलंदाजीविषयी म्हणाला, 'त्यावेळी पाऊस पडला होता. चेंडू ओला झाला होता आणि त्यामुळे काही मदत होत नव्हती. म्हणून आम्ही क्रॉस सीम गोलंदाजी करण्याचा विचार केला. खेळपट्टीवर बाऊन्स होता. खरंतर बुमराहने मला सांगितले की खेळपट्टीवर गोलंदाजीत काही होत नसल्याने आपण क्रॉस सीम करण्याचा प्रयत्न करु शकतो.' 'प्रयत्न एवढाच होता की जेवढे लवकर प्रतिस्पर्धी संघाला बाद करता येईल तेवढे लवकर करायचे, हेच संघासाठी चांगले होते. आम्ही त्याचाच प्रयत्न केला आणि त्यात आम्हाला यश मिळाले.' याबरोबरच भारतीय संघ पहिल्या डावात फलंदाजी करत असताना रविंद्र जडेजाला 8 व्या विकेटसाठी इशांतने चांगली साथ दिली होती. त्याने जडेजाबरोबर 60 धावांची भागीदारी रचली. इशांतने 19 धावा केल्या.

या भागादारीबद्दल इशांत म्हणाला, 'खरं सांगू का मी जेव्हा बाद झालो तेव्हा मला चांगले वाटले नाही. मी जडेजाबरोबर जेवढे जास्त धावा करणार होतो तेवढे संघासाठी चांगले होते. 25 धावांवर 3 बाद अशा परिस्थितीतून आम्ही ज्याप्रकारे पुनरागमन केले, त्यानंतर मला जडेजाबरोबर मोठी भागीदारी करायची होती.' त्याचबरोबर इशांतने क्षेत्ररक्षण करतानाही चांगली कामगिरी केली. त्याने स्वत:च्या गोलंदाजीवर दोन झेल घेतले. याचे श्रेय इशांतने क्षेत्ररक्षक प्रशिक्षक श्रीधर यांना दिले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Who is Sushil Kedia: राज ठाकरेंना चॅलेंज देणारा सुशील केडिया कोण आहे? कसे कमावले कोट्यवधी रुपये?

IND vs ENG 2nd Test: Ohhh NO! शुभमन गिलच्या डोक्यावर चेंडू जोरात आदळला, डॉक्टरांची मैदानावर धाव अन्...

VIRAL VIDEO: यांना 'महाराष्ट्र केसरी' म्हणावं की दुसरं काही! दोन घोरपडीमध्ये रंगली दंगल, व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल

Alternative Careers: 9 ते 5 च्या ठराविक नोकरीला कंटाळला आहात? मग 'हे' 8 करिअर पर्याय तुमच्यासाठी ठरू शकतात योग्य पर्याय!

Viral: पैसे उधार घेणाऱ्यांनो लक्ष द्या...! उसने घेतलेली रक्कम वेळेत परत केली नाही तर होणार जेल अन्..., न्यायालयाचा निर्णय

SCROLL FOR NEXT