BWF World Championship 2022 lakshya sen kidambi srikanth hs pranoy enters second round sai praneeth lose sakal
क्रीडा

BWF World Championship 2022 : श्रीकांत, लक्ष्य, प्रणॉयची विजयी सलामी

जागतिक स्पर्धेत साईप्रणीतचा पराभव

सकाळ वृत्तसेवा

टोकियो : गतवेळच्या स्पर्धेमध्ये पदक जिंकणाऱ्या किदांबी श्रीकांत व लक्ष्य सेन यांच्यासह एच. एस. प्रणॉय यानेही यंदाच्या जागतिक बॅडमिंटन स्पर्धेची सुरुवात धडाकेबाज केली. भारताच्या या तिन्ही बॅडमिंटनपटूंना पुरुषांच्या एकेरीत विजय संपादन करता आला. बी. साईप्रणीत मात्र पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला. श्रीकांत याने एनहॅट एनग्युयेन याच्यावर २२-२०, २१-१९ अशा फरकाने विजय साकारला आणि पुढे वाटचाल केली. प्रणॉय याने लुका रेबर याला २१-१२, २१-११ अशा फरकाने नमवले. लक्ष्यलाही पहिल्या फेरीचा अडथळा ओलांडायला जास्त परिश्रम लागले नाही. त्याने हॅन्स विटिंगहस याला २१-१२, २१-११ अशा फरकाने पराभूत केले. चौथ्या मानांकित चोऊ टिएन चेन याने मात्र साईप्रणीतला नमवले. त्याने भारताच्या खेळाडूवर २१-१५, १५-२१, २१-१५ अशा फरकाने विजय संपादन केला.

मालविका बन्सोडकडून महिला एकेरीत निराशा

भारताची महिला खेळाडू मालविका बन्सोड हिलाही निराशेला सामोरे जावे लागले. महिला एकेरीच्या लढतीत तिला लाईन ख्रिस्तोफरसेन हिच्याकडून पराभूत व्हावे लागले. लाईन हिने ही लढत २१-१४, २१-१२ अशा फरकाने जिंकली.

दुहेरीत संमिश्र यश

भारतीय बॅडमिंटनपटूंना दुहेरीत संमिश्र यश मिळाले. एन. सिक्की रेड्डी व अश्‍विनी पोन्नाप्पा तसेच एम. आर. अर्जुन - ध्रुव कपिला व पूजा दंडू - संजना संतोष आणि इशान भटनागर - तनीषा क्रॅस्टो या जोड्यांनी प्रतिस्पर्ध्यांना हरवत पुढे पाऊल टाकले. पण मनू अत्री व सुमीत रेड्डी या जोडीचा पराभव झाला. हिरोकी ओेकामुरा - मासायुकी ओनोदेरा यांनी मनू व सुमीत या जोडीवर २१-११, १९-२१, २१-१५ असा विजय मिळवला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Farmer Loan Waiver : कर्जमुक्ती योजनेत 65 हजार शेतकरी पात्र; 35 हजार जणांचे आधार प्रमाणीकरण पूर्ण, पहिल्या टप्प्यातील यादी प्रसिद्ध

Mumbai News: १० वर्षांच्या मुलाच्या पोटातून काढले एक किलो चुंबक, डॉक्टरांनी वाचवला जीव; गंभीर आजाराने ग्रस्त

Latest Marathi News Live Update : इंग्रज फक्त केसरी आणि द मराठा या वृत्तपत्रांना घाबरायचे : अमित शहा

पंतप्रधान १०० टक्के योग्यच, पण दुसऱ्यांनाही आया असतात; १२ वर्षे तुमच्या लोकांनी केलं त्याची माफी कोण मागणार, राज ठाकरेंचा सवाल

Nashik Municipal Corporation : 'लोकांच्या असंतोषाची परीक्षा पाहू नका, इतिहास आपल्या समोर आहे'; मंत्री छगन भुजबळ यांनी कोणावर साधला निशाणा?

SCROLL FOR NEXT