Akane Yamaguchi 
क्रीडा

BWF World Championships : यामागुचीने जेतेपद राखले

अव्वल मानांकित जपानच्या अकाने यामागुची हिने जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद राखले

सकाळ वृत्तसेवा

टोकियो : अव्वल मानांकित जपानच्या अकाने यामागुची हिने जागतिक बॅडमिंटन अजिंक्यपद स्पर्धेचे जेतेपद राखले. तिने रविवारी झालेल्या अंतिम फेरीच्या लढतीत चीनच्या चेन युफेई हिच्यावर तीन गेममध्ये विजय संपादन करीत सलग दुसऱ्या विश्‍वविजेतेपदाचा मान संपादन केला. पुरुषांच्या एकेरीच्या गटात डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसन याने बाजी मारली.

यामागुची हिने पहिला गेम २१-१२ अशा फरकाने जिंकला व १-० अशी आघाडी घेतली. चेनने दुसऱ्या गेममध्ये पुनरागमन करताना २१-१० असे यश मिळवले. यामागुची हिने मात्र तिसऱ्या गेममध्ये मात्र २१-१४ अशा फरकाने यश मिळवत लढत आपल्या नावावर केली. चीनच्या चेनच्या जेतेपदाच्या स्वप्नांना या वेळी सुरुंग लागला.

चीनच्या महिला खेळाडूंनी एकेरी गटात एकूण १५ जागतिक स्पर्धेच्या जेतेपदांना गवसणी घातली आहे. इतर कुठल्याही देशांतील खेळाडूंना अशी कामगिरी करता आलेली नाही; पण २०११ नंतर त्यांना एकदाही या गटाचे जेतेपद पटकावता आलेले नाही. तसेच २०१४ नंतर या स्पर्धेची अंतिम फेरी गाठणारी चेन ही चीनची पहिलीच बॅडमिंटनपटू ठरली हे विशेष; पण चेनला यामागुचीवर वर्चस्व गाजवता आले नाही.

डेन्मार्कच्या खेळाडूचे दुसरे जेतेपद

डेन्मार्कच्या व्हिक्टर एक्सेलसन याने रविवारी जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या जेतेपदावर अगदी रुबाबात मोहोर उमटवली. त्याने जेतेपदाच्या लढतीत थायलंडच्या कुनलावूत वितीदसर्ण याच्यावर २१-५, २१-१६ अशा फरकाने विजय साकारला. त्याने ५० मिनिटांमध्ये प्रतिस्पर्ध्याला हरवले.

याआधी व्हिक्टरने २०१७ मध्ये पहिल्यांदा या स्पर्धेचा जेता होण्याचा मान संपादन केला होता. टोकियो ऑलिंपिकमध्येही त्याने सुवर्णपदक पटकावले आहे, हे विशेष.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

T20 WC, IND W vs PAK W : भारताचा पाकिस्तानला धुळ चारत सर्वात मोठा विजय! दिप्ती शर्माचा विकेट्सचा पंजा, तर श्री चरणीही चमकली

NDA ला मोठा धक्का! 2026 नंतर आघाडीमध्ये पहिली फूट पडली; मोठ्या मित्रपक्षाने साथ सोडली, राजकीय समीकरणे बदलणार?

TMC Split: पश्चिम बंगालच्या राजकारणात भूकंप! टीएमसीचे बंडखोर खासदार दुसऱ्या पक्षात विलीन होणार; NDA ला पाठिंबा देणार

Poet Honoured: रुबाईकार रमेश वैद्य यांना काव्यरसिकचा जीवनगौरव; ‘खरे कवी आणि सच्चे माणूस’ असा हिमांशू कुलकर्णींचा गौरवोद्गार

Manchar Crime : मंचरमध्ये तरुणीला कालव्यात ढकलण्याची धक्कादायक घटना; आरोपी तरुण अटकेत, एनडीआरएफकडून तीव्र शोधमोहीम

SCROLL FOR NEXT