Badminton World Championship 2022 
क्रीडा

Badminton World Championship 2022 : आता लक्ष्य सेनविरुद्ध सामना; प्रणॉयचा सनसनाटी विजय

भारताच्या एच. एस. प्रणॉय याने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत बुधवारी धक्कादायक निकालाची नोंद

सकाळ वृत्तसेवा

टोकियो : भारताच्या एच. एस. प्रणॉय याने जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत बुधवारी धक्कादायक निकालाची नोंद केली. त्याने दुसरा मानांकित व दोन वेळा जागतिक स्पर्धा जिंकणाऱ्या कॅटो मोमोटा याला पराभूत करीत पुरुषांच्या एकेरीत पुढे पाऊल टाकले. प्रणॉयसमोर आता पुढील फेरीत गतवेळच्या ब्राँझपदक विजेत्या लक्ष्य सेन याचे आव्हान असणार आहे. यामुळे दोन भारतीयांपैकी एकच खेळाडू उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश करील. गतवेळचा रौप्यपदक विजेत्या किदांबी श्रीकांत याला मात्र पुरुषांच्या एकेरीत पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे त्याचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले.

प्रणॉय मोमोटा यांच्यामध्ये बुधवारी लढत झाली; पण या लढतीच्या पूर्वसंध्येला प्रणॉय याने या लढतीबाबत मत व्यक्त करताना म्हटले की, जागतिक स्पर्धेचा ड्रॉ आव्हानात्मक आहे. पण जागतिक स्पर्धा जिंकण्यासाठी सर्व खेळाडूंना हरवणे गरजेचे असते. उद्या मी मोमोटा याच्याविरुद्ध खेळणार आहे. या लढतीसाठी मी काही योजना आखल्या आहेत. माझ्याकडून छान खेळ होत आहे, पण मोमोटाला हरवण्यासाठी मी चांगल्या मनःस्थितीत असणे आवश्यक आहे, असे तो पुढे म्हणाला. प्रणॉयने आदल्या दिवशी म्हटल्याप्रमाणे या लढतीत खेळ केला.

त्याने पहिला गेम २१-१७ व दुसरा गेम २१-१६ अशा फरकाने जिंकत पुढे वाटचाल केली. तसेच या दोन खेळाडूंमध्ये आतापर्यंत झालेल्या आठ लढतींमध्ये प्रणॉयला पहिल्यांदाच विजय मिळवता आलेला आहे. लक्ष्यने स्पेनच्या लुईस पेनाल्वर याचे आव्हान २१-१७, २१-१० अशा फरकाने परतवून लावले आणि उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

श्रीकांतकडून निराशा

गतवेळच्या जागतिक स्पर्धेमध्ये रौप्यपदक पटकावणाऱ्या श्रीकांतने यंदाच्या थॉमस करंडकातही संस्मरणीय कामगिरी केली. पण टोकियोमधील यंदाच्या जागतिक स्पर्धेत त्याला आपला चमकदार फॉर्म कायम राखता आला नाही. चीनच्या झाओ पेंग याने श्रीकांतला २१-९, २१-१७ अशा फरकाने पराभूत केले आणि घोडदौड केली.

सात्त्विक चिराग, अर्जुन कपिला विजयी

पुरुषांच्या दुहेरीत भारतीय दोन जोड्यांनी छान कामगिरी केली. गेल्या काही काळापासून छान खेळ करणारी सात्त्विक रेड्डी व चिराग शेट्टी या भारताच्या जोडीने जोनाथन सोलीस-अॅनिबल मारोक्वीन या जोडीला २१-८, २१ १० अशा फरकाने नमवले. एम. आर. अर्जुन-ध्रुव कपिला या जोडीनेही प्रतिस्पर्ध्याला हरवत पुढे वाटचाल केली. या जोडीने किम अॅसत्रुप-अँडर्स रासमुसेन या जोडीला २१-१७, २१-१६ अशा फरकाने पराभूत केले.

या जोड्यांचा सुमार खेळ...

भारताला दुहेरी गटात इतर जोड्यांकडून निराशेचा सामना करावा लागला. अश्विनी पोन्नाप्पा-एन. सिक्की रेड्डी, ट्रीसा जॉली-गायत्री पुलेला, अश्विनी भट-शिखा गौतम, पूजा धंडू-संजना संतोष या भारताच्या चार जोड्यांचा पराभव झाला. यामुळे त्यांचे आव्हान संपुष्टात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Assam Election Exit Poll : आसाममध्ये पुन्हा एकदा फुलणार कमळ! NDA ला 100 जागा मिळण्याचा अंदाज, काँग्रेसच्या स्वप्नांवर पाणी; पाहा कोणाला किती जागा?

Navi Mumbai: नवी मुंबईत खासगी शाळांची मनमानी! मैदानांवर विनापरवानगी टर्फ उभारण्याच्या प्रकारात वाढ; पालिकेकडे कारवाईची मागणी

दुहेरी हत्याकांडाने पालघर हादरलं! आधी प्रेयसीसह आईवर हल्ला, नंतर तरुणाचा स्वत:वरही वार, थरारक कृत्याचं संतापजनक कारण समोर

MI vs SRH Live: रोहित शर्मा आजचाच नव्हे, तर आणखी काही सामने मुकणार; हार्दिक पांड्याने दिले अपडेट्स, मुंबई इंडियन्सच्या संघात ३ बदल

Cigarette Rate Hike: धूम्रपान करणाऱ्यांना मोठा झटका! सिगारेट तब्बल 17% नी महागणार; एका पाकिटामागे किती शुल्क आकारणार?

SCROLL FOR NEXT