BWF World Championships 2022 hs prannoy beats lakshya sen to enter bwf world championships quarters sakal
क्रीडा

BWF World Championships : प्रणॉयची उपांत्यपूर्व फेरीत धडक

जागतिक बॅडमिंटन स्पर्धा : १ तास १५ मिनिटांच्या झुंजीनंतर लक्ष्यचा पराभव

सकाळ वृत्तसेवा

टोकियो : भारताच्या एच. एस. प्रणॉय याची पुरुषांच्या एकेरीतील झंझावाती कामगिरी गुरुवारीही कायम राहिली. त्याने गेल्या काही महिन्यांपासून फॉर्ममध्ये असलेल्या भारताच्याच लक्ष्य सेनवर तीन गेममध्ये १ तास व १५ मिनिटांच्या झुंजीनंतर विजय मिळवला आणि जागतिक बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आता प्रणॉयसमोर चीनच्या झाओ जुन पेंग याचे आव्हान असणार आहे.

प्रणॉय व लक्ष्य यांच्यामधील लढत रोमहर्षक झाली. लक्ष्यने पहिला गेम २१-१७ अशा फरकाने जिंकत आघाडी घेतली. त्यानंतर प्रणॉय याने दुसऱ्या गेममध्ये २१-१६ अशा फरकाने बाजी मारली. तिसऱ्या गेममध्येही दोन्ही खेळाडूंमध्ये चुरस पाहायला मिळाली. प्रणॉयने दबावाखाली आपला खेळ उंचावला आणि २१-१७ अशा फरकाने गेमवर ताबा मिळवला. या वर्षी आतापर्यंत दोघांमध्ये चार लढती झालेल्या आहेत. प्रणॉय व लक्ष्य या दोघांनी प्रत्येकी २ लढती जिंकत बरोबरी साधली.

साईनाचे आव्हान संपुष्टात

भारताची अनुभवी महिला खेळाडू साईना नेहवाल हिला आंतरराष्ट्रीय स्तरावर गेल्या काही काळात यश संपादन करता आलेले नाही. जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत तिने दमदार सुरुवात केली होती. पण उपउपांत्यपूर्व फेरीच्या लढतीत तिला थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफान हिच्याकडून तीन गेममध्ये हार पत्करावी लागली. थायलंडच्या खेळाडूने पहिला गेम २१-१७ अशा फरकाने आपल्या नावावर केला. साईनाने दुसऱ्या गेममध्ये यश मिळवले. तिने हा गेम २१-१६ अशा फरकाने जिंकला. पण तिसऱ्या गेममध्ये साईनाला सूर गवसला नाही. अखेर २१-१३ अशा फरकाने ती पराभूत झाली आणि आव्हान संपुष्टात आले.

पुरुष दुहेरीत भारतीय जोड्यांची कमाल

भारताच्या बॅडमिंटनपटूंनी पुरुष दुहेरीच्या गटात दमदार कामगिरी केली. दोन जोड्यांनी उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. एम. आर. अर्जुन - ध्रुव कपिला या जोडीने ही योंग टेरी - लोह कीन हीन या जोडीवर तीन गेममध्ये थरारक विजय मिळवला. भारतीय जोडीला पहिल्या गेममध्ये २१-१८ अशा फरकाने पराभूत व्हावे लागले. त्यानंतर मात्र अर्जुन - कपिला जोडीने २१-१५, २१-१६ अशा फरकाने विजय साकारत पुढे पाऊल टाकले. भारतीय जोडीने ५८ मिनिटांमध्ये प्रतिस्पर्ध्यांना नमवले. सात्त्विक रेड्डी - चिराग शेट्टी या अनुभवी जोडीने जेप्पे बे - लासे मोलहेदे या जोडीचे आव्हान २१-१२, २१-१० अशा फरकाने अवघ्या ३५ मिनिटांमध्ये संपुष्टात आणले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : रामाच्या नावे मतं मागणाऱ्यांनी दानचोरीवर बोलायला नको का? राज ठाकरेंचा सवाल

Ahilyadevi Holkar Loan Waiver : कर्जमाफी अन् 50 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान! 41 हजार 552 शेतकऱ्यांचे खाते होणार नील; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

KDMC: परवानगी १४ मजल्यांची, बांधले २१ इमले; सात मजले बेकायदा, बिल्डरसह केडीएमसी अधिकाऱ्यांचे धक्कादायक कारनामे

Koyna Dam Water Release : कोयना धरणाचे सहा दरवाजे ६ फूटांनी उचलले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; ३३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

Ratnagiri Tourism : मिनी महाबळेश्वर' माचाळमधील प्रसिद्ध 'भिषाचा कडा' बनतोय धोकादायक! 'उलट्या धबधब्यावर' पर्यटकांचा जीव धोक्यात; तातडीने सुरक्षा भिंत उभारण्याची मागणी

SCROLL FOR NEXT