Serena Margaret 
क्रीडा

BWF World Championships 2022 : सेरेनाच्या कामगिरीकडे लक्ष

अमेरिकन ग्रँडस्लॅम : राफेल नदाल प्रबळ दावेदार

सकाळ वृत्तसेवा

न्यूयॉर्क : अमेरिकन ओपन या टेनिस विश्‍वातील या वर्षातील अखेरच्या ग्रँडस्लॅम स्पर्धेला उद्यापासून (२९ ऑगस्‍ट) सुरुवात होत आहे. या वेळी महिला एकेरीच्या लढतीत सेरेना विल्यम्सच्या कामगिरीकडे तमाम टेनिसप्रेमींच्या नजरा खिळल्या आहेत. ही स्पर्धा तिच्या कारकीर्दीतील अखेरची असेल, असे तिने संकेत दिले आहेत. त्यामुळे अमेरिकन ओपन ग्रँडस्लॅम जिंकून सेरेना मार्गरेट कोर्टच्या सर्वाधिक २४ ग्रँडस्लॅम जेतेपदाची बरोबरी करते का, हे पाहणे या वेळी रंजक ठरणार आहे.

सेरेनाने अखेरचे ग्रँडस्लॅम जेतेपद २०१७ मध्ये पटकावले होते. तिने त्यावर्षी ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धा जिंकण्याची किमया साधली होती. त्यानंतर मात्र मागील ५ वर्षांमध्ये तिला एकाही ग्रँडस्लॅमच्या जेतेपदाला गवसणी घालता आलेली नाही. गेल्या काही काळामध्ये कुटुंब व दुखापत यामुळेही तिला सातत्याने टेनिस कोर्टपासून दूर राहावे लागत आहे. तसेच तिने आता व्यवसायातही पाऊल ठेवले आहे. आपल्या कुटुंबाला तसेच व्यवसायाला वेळ देण्यासाठी सेरेना आंतरराष्ट्रीय टेनिसला अलविदा करणार आहे.

तीन ग्रँडस्लॅम जिंकण्याची संधी

स्पेनचा महान टेनिसपटू राफेल नदाल या वर्षी जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. या पठ्ठ्याने ऑस्ट्रेलियन ओपन व फ्रेंच ओपन या दोन ग्रँडस्लॅमची जेतेपदे पटकाविली. त्यानंतर विम्बल्डन स्पर्धेत दुखापतीमुळे निक किर्गीओसविरुद्धच्या उपांत्य लढतीत तो खेळू शकला नाही. अखेर त्याने स्पर्धेमधून माघार घेतली. नदालने २०१० मध्ये तीन ग्रँडस्लॅम स्पर्धा जिंकण्याचा पराक्रम केला होता. २०२२ मध्येही त्याला या कामगिरीची पुनरावृत्ती करण्याची संधी असेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : इंग्रज फक्त केसरी आणि द मराठा या वृत्तपत्रांना घाबरायचे : अमित शहा

Kolhapur Ambabai Temple : अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत मोठा निर्णय! मूळ ढाच्याला बाधा न आणता काम करण्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे 'पुरातत्त्व'ला निर्देश

Bhiwandi Building Collapse: ढिगाऱ्यातही जिवंत राहिली आईची माया, भिवंडी दुर्घटनेतील 'त्या' प्रसंगाने सर्वांचे डोळे पाणावले; काय घडलं?

Army Major Accident : उंटाला धडकली आर्मी मेजरची भरधाव कार, महिन्याभरापूर्वी लग्न झालेल्या मेजरचा जागीच मृत्यू, दोन लेफ्टनंट गंभीर जखमी

R. Ashwin: भुवीला पुनरागमनाचा सल्ला, वैभव सूर्यवंशीला डच्चू! 2027 वर्ल्ड कपसाठी अश्विनचा BCCI ला मोठा सल्ला; पाहा कोण IN, कोण OUT

SCROLL FOR NEXT