BWF World Championships Saina Nehwal advances to pre-quarterfinals  esakal
क्रीडा

BWF World Championships : सायनाची धडाक्यात सुरूवात, प्री क्वार्टरफायनलमध्ये केला प्रवेश

अनिरुद्ध संकपाळ

टोकियो : लंडन ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदक पटकावणाऱ्या सायना नेहवालने बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद (BWF World Championships) स्पर्धेत दमदार सुरूवात केली. तिने हाँग काँगच्या चेऊंग ननाग यी चा सरळ दोन गेममध्ये पराभव केला. सायनाने 38 मिनिटात हाँग काँगच्या यीचे पॅक अप केले. तिने सामना 21 - 19, 21 - 09 असा जिंकला.

32 वर्षाच्या सायनाने यापूर्वी जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत रौप्या आणि कांस्य पदक जिंकले आहे. तिने यंदाच्या बॅडमिंटन जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत प्री क्वार्टरफायनलमध्ये प्रवेश केला. दुसऱ्या फेरीतील सायना विरूद्ध खेळणाऱ्या नोझोमी ओकुहाराने दुखापतीमुळे स्पर्धेतूनच माघार घेतली. त्यामुळे बाय मिळालेल्या सायनाचा प्री क्वार्टरफायनलचा मार्ग मोकळा झाला.

दरम्यान, महिला दुहेरीत ट्रीसा जॉली आणि गायत्री गोपीचंद यांनी देखील विजयी सुरूवात केली. भारताच्या या महिला जोडीने मलेशियाच्या यीन युआन लोव्ह आणि वालेरी सिओव्हचे कडवे आव्हान 21 - 11 21 -13 असे परतवून लावले. मात्र भारताला मिश्र दुहेरीत पराभवाचा सामना करावा लागला. व्यंकट गुरूअन प्रसाद आणि जुही देवांगन यांचा इंग्लंडच्या ग्रेगोरी मारिस आणि जेनी मूरे या जोडीने 10 - 21, 21 - 23 असा पराभव केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : २०१६ला नीटचा पेपर फुटला तेव्हा PM मोदींना कॉल केलेला; राज ठाकरे काय म्हणाले?

Kolhapur Ambabai Temple : अंबाबाई मंदिराच्या संवर्धनाबाबत मोठा निर्णय! मूळ ढाच्याला बाधा न आणता काम करण्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकरांचे 'पुरातत्त्व'ला निर्देश

Bhiwandi Building Collapse: ढिगाऱ्यातही जिवंत राहिली आईची माया, भिवंडी दुर्घटनेतील 'त्या' प्रसंगाने सर्वांचे डोळे पाणावले; काय घडलं?

Army Major Accident : उंटाला धडकली आर्मी मेजरची भरधाव कार, महिन्याभरापूर्वी लग्न झालेल्या मेजरचा जागीच मृत्यू, दोन लेफ्टनंट गंभीर जखमी

R. Ashwin: भुवीला पुनरागमनाचा सल्ला, वैभव सूर्यवंशीला डच्चू! 2027 वर्ल्ड कपसाठी अश्विनचा BCCI ला मोठा सल्ला; पाहा कोण IN, कोण OUT

SCROLL FOR NEXT