Ricky Ponting Statement Over Virat Kohli esakal
क्रीडा

Virat Kohli : विराट सचिनचं 'शतकी' रेकॉर्ड मोडणार? रिकी पॉटिंग म्हणतो...

अनिरुद्ध संकपाळ

Ricky Ponting Statement Over Virat Kohli : भारताचा रन मशिन विराट कोहलीने जवळपास तीन वर्ष रखडलेले 71 वे आंतरराष्ट्रीय शतक आशिया कपमध्ये झळकावले. त्याने अफगाणिस्तानविरूद्धच्या टी 20 सामन्यात नाबाद 122 धावा करून ऑस्ट्रेलियाच्या रिकी पॉटिंगच्या 71 आंतरराष्ट्रीय शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली. याबाबत ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पाँटिंगने आपले मत व्यक्त केले. याचबरोबर विराट कोहली सचिन तेंडुलरच्या शतकांच्या शतकाचे रेकॉर्ड मोडणार का यावर देखील पॉटिंग बोलला आहे.

विराट कोहली सचिन तेंडुलकरचे शतकांच्या शतकाचे रेकॉर्ड मोडणार का असा प्रश्न रिकी पॉटिंगला विचारण्यात आला. त्यावर पॉटिंगने म्हणाला की, 'तुम्ही हा प्रश्न तर तीन वर्षापूर्वी विचारला असता तर मी खात्रीने हो म्हणालो असतो. मात्र खरं सांगायचं झालं तर त्याचा वेग आता मंदावला आहे.'

पॉटिंग पुढे म्हणाला की, 'मात्र मला अजूनही असे वाटते की त्याच्याकडे अजून काही वर्षे आहेत. अजूनही त्याला 30 आंतरराष्ट्रीय शतके ठोकायची आहेत. हा आकडा खूप आहे. यासाठी त्याला पुढच्या तीन ते चार वर्षात वर्षाला पाच ते सहा कसोटी शतके ठोकावी लागतील. त्याच्या जोडीला दोन चार वनडे शतके आणि एखदं टी 20 शतक ठोकावं लागेल.'

शेवटी पॉटिंग म्हणाला की, 'मी विराट करू शकणार नाही असं म्हणणार नाही. जर विराट कोहली एकदा का त्या झोनमध्ये आला तर तो धावांसाठी किती भुकेला असतो हे तुम्हाला माहिती आहे. त्यामुळे मी विराट करूच शकणार नाही असं म्हणणार नाही.'

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Aadhaar Card: आधार कार्ड कुठे आणि कशासाठी वापरले ते कळणार; नवीन अॅपमुळे काम सोप होणार, प्रक्रिया काय?

सचिन पिळगांवकरांना सुद्धा लागलं FA9LA गाण्याचं वेड, सुप्रियासोबत केला भन्नाट डान्स, viral video

Ichalkaranji Muncipal : इचलकरंजीत भाजपची कसोटी; नवे-जुने संघर्षामुळे निवडणूक रंगात

पोरींनो या क्षेत्रात येऊ नका... गौतमी पाटीलचा तरुण मुलींना सल्ला; म्हणाली, 'मला सिद्धार्थ जाधवने सांगितलेलं की...

Night Milk Benefits: हिवाळ्यातील आरोग्याचं गुपित! हिवाळ्यात रात्री दूधात साखरे ऐवजी गुळ मिसळून प्यायल्याने दूर होतात 'या' 4 समस्या

SCROLL FOR NEXT