Ben Stokes sakal
क्रीडा

Ben Stokes : अंपायर्स कॉल रद्द करा ; इंग्लंड संघाचा कप्तान बेन स्टोक्सने डीआरएस प्रणालीवरून शंका

इंग्लंड संघाचा कप्तान बेन स्टोक्सने डीआरएस प्रणालीवरून शंका व्यक्त केली. दुसऱ्या डावात इंग्लंडच्या काही फलंदाजांना बाद ठरवताना टीव्हीवर रिप्ले बघून दिले गेलेले निर्णय न कळणारे होते, असेही म्हणाला.

सकाळ वृत्तसेवा

राजकोट : इंग्लंड संघाचा कप्तान बेन स्टोक्सने डीआरएस प्रणालीवरून शंका व्यक्त केली. दुसऱ्या डावात इंग्लंडच्या काही फलंदाजांना बाद ठरवताना टीव्हीवर रिप्ले बघून दिले गेलेले निर्णय न कळणारे होते, असेही म्हणाला. डीआरएस प्रणालीत अंपायर्स कॉल प्रकार बंद करायला पाहिजे, असे मत व्यक्त करताना बेन स्टोक्सने गोलंदाजाने टाकलेला चेंडू यष्टींवर आदळतोय का चाटून जातोय याला महत्त्व नसल्याचे सांगताना पायचीत असल्याची दाद मागितल्यावर चेंडू यष्टींना लागत असला तर फलंदाज बाद दिला गेला पाहिजे, असे मत व्यक्त केले.

काही वर्षांपूर्वी भारतीय संघाचा कर्णधार असताना विराट कोहलीनेही अंपायर्स कॉल रद्द करण्याची मागणी केली होती, परंतु त्याला फारसा कोणी प्रतिसाद दिला नव्हता. इंग्लंडचे माजी कर्णधार नासीर हुसेन यांनी मात्र अंपायर्स कॉल कायम राहिला पाहिजे असे मत व्यक्त केले आहे.

इंग्लंड संघाला घरचा आहेर

मोठ्या पराभवानंतर इंग्लंड संघावर त्यांच्या पत्रकार आणि माजी खेळाडूंनी अपेक्षित जोरदार टीका केली आहे. खास करून अनुभवी फलंदाज ज्यो रूटच्या बाद होताना मारलेल्या फटक्यांवरून जास्त राग व्यक्त केला गेला आहे. जरी बेन स्टोक्स विजय असो वा पराभव, दोनही मागे टाकून पुढच्या सामन्याचा विचार नव्याने करायची गोष्ट करत असला तरी सलग दोन कसोटीत झालेल्या पराभवांनी पाहुण्या संघाच्या मनोधैर्याला लागलेली ठेच स्पष्ट दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी मोठी बातमी! जुलैमध्ये सोनं 25 हजारांनी महाग; चांदी मात्र स्वस्त; पाहा ताजा भाव

Sharad Pawar: सोनम वांगचुकांना ताब्यात घेताच शरद पवारांचा केंद्रावर घणाघात; 'हा उद्दामपणा, आंदोलन दडपता येणार नाही'

Latest Marathi News Live Update : सोनम वांगचुक यांच्यानंतर CJP संस्थापक अभिजीत दिपके यांचे बेमुदत उपोषण सुरू

Badminton : भारताची स्टार खेळाडू पी.व्ही. सिंधू दोन वर्षानंतर जेतेपदाची लढत खेळणार; Japan Open च्या फायनलमध्ये प्रवेश

Donald Trump: FIFA फायनलमध्ये ट्रम्पची एंट्री! विजेत्या खेळाडूंना मिळणार सोन्याची खास अंगठी

SCROLL FOR NEXT