Vidit Gujrathi | Candidates Chess X/chesscom
क्रीडा

Candidates Chess: भारताच्या विदीतचा मोठा उलटफेर, वर्ल्ड नंबर-3 च्या खेळाडूला दिला पराभवाचा धक्का; प्रज्ञानानंद मात्र पराभूत

Vidit Gujrathi: कँडिडेट चेस स्पर्धेत भारताच्या विदीत गुजराथीने जागतिक क्रमवारीतील तिसऱ्या क्रमांकाच्या खेळाडूला पराभवाचा धक्का दिला.

Pranali Kodre

Candidates Chess Tournament: कँडिडेट चेस स्पर्धा सध्या सुरू असून यात भारताचे खेळाडूही सहभागी झाले आहेत. या स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत भारताचा ग्रँडमास्टर विदीत गुजराथीने मोठा पराक्रम केला.

त्याने जागतिक क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या आणि विजयाचा प्रबळ दावेदार असलेल्या अमेरिकेच्या हिकारू नाकामुरा याला पराभूत केले. ४७ क्लासिकल गेममधील हा हिकारूचा पहिलाच पराभ ठरला. मात्र स्टार चेस खेळाडू आर प्रज्ञानानंदला मात्र पराभवाचा धक्का बसला.

या स्पर्धेच्या पहिल्या दिवशी चारही सामने ड्रॉ झाले होते. परंतु, दुसऱ्या फेरीतील सामन्यांमध्ये निकाल लागले. प्रज्ञानानंदला भारताच्याच डी गुकेशने दुसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का दिला.

तसेच अमेरिकेचा अव्वल मानांकित फॅबियानो कारुआनाने अजरबैजानच्या निजत आबासोवला पराभूत केले, तर रशियाच्या जॅन नेपोम्नियाचीने फ्रान्सच्या फिरोजा अलीरेझाला पराभूत केले.

महिलांच्या विभागात आर वैशालीने चीनच्या झोंगयी टॅन हिच्याविरुद्ध कडवी झुंज दिली. मात्र तिला पराभवाचा धक्का बसला. मात्र भारताच्या कानक हम्पीला रशियाच्या कॅटरिना लागनोविरुद्ध सामना अनिर्णित राखण्यात यश मिळाले.

आता या स्पर्धेत दुसऱ्या फेरीनंतर विदीत, गुकेश, कारुआना आणि नेपोम्नियाची हे चौघेही १.५ गुणांसह आघाडीवर आहेत. तसेच प्रज्ञानानंद आणि नाकामुरा दुसऱ्या क्रमांकावर आहेत. महिलांमध्ये टॅन आघाडीवर आहे. तिच्यानंतर हम्पी, सालिमोवा आणि लँगो आहेत. वैशाली सहाव्या क्रमांकावर आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jan Vishwas Bill 2026: संसदेत जन विश्वास विधेयक मंजूर; किरकोळ गुन्हे होणार रद्द, तर १ कोटी रुपयांपर्यंत दंडाची तरतूद

IPL 2026 Marathi News: हा जोकर... मी याच्यावर बंदी घातली असती! संजीव गोएंका यांचा Video अन् ललित मोदीचा चढला पारा

इराणला मोठा धक्का! ३७ हजार कोटी खर्चून मध्य-पूर्वेत सर्वात ऊंच पूल बांधला, अमेरिकेनं उडवला; वीज पुरवठाही खंडित

Pargaon News : दिलीप वळसे-पाटील यांनी आंबेगावच्या पूर्व भागातील गारपिटीसह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या भागाची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला

अहमदाबाद-पुणे विमान थेट गोव्याला वळवलं, मुसळधार पावसामुळे निर्णय; प्रवाशांचे हाल

SCROLL FOR NEXT