West Indies vs India 2nd Test Day 3 esakal
क्रीडा

WI vs IND 2nd Test : तीन सत्रात फक्त चार विकेट; विंडीजने भारतीय गोलंदाजांना चांगलेच दमवले

अनिरुद्ध संकपाळ

West Indies vs India 2nd Test Day 3 : भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी विंडीजच्या फलंदाजांनी चांगलाच झुंजारपणा दाखवला. त्यांनी दिवसाचे पूर्ण तीन सेशन खेळून काढले. कर्णधार क्रेग ब्रेथवेटच्या (Kraigg Brathwaite) दमदार 75 धावांच्या खेळीच्या जोरावर विंडीजने दिवसअखेर 5 बाद 229 धावा केल्या. विंडीज अजूनही 209 धावांनी पिछाडीवर आहे.

दिवसाचा खेळ थांबला त्यावेळी अथनाझे 37 तर जेसन होल्डर नाबाद 11 धावा करून क्रिजवर होते. भारताला दिवसभरात विंडीजच्या चार विकेट घेण्यात यश आले. रविंद्र जडेजाने 2 तर सिराज, अश्विन आणि मुकेशने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यातील दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी विंडीज आपला पहिला डाव 1 बाद 86 धावांपासून पुढे खेळण्यास सुरूवात केली. विंडीजचा कर्णधार आणि सलामीवीर क्रेग ब्रेथवेटने क्रिक मॅकेन्झीसोबत 46 धावांची भागीदारी रचत संघाला शतकी मजल मारून दिली.

मात्र ही जोडी डोकेदुखी ठरणार असे वाटत असतानाच पदार्पण करणाऱ्या मुकेश कुमारने मॅकेन्झीला 32 धावांवर पॅव्हेलियनमध्ये धाडले. यानंतर पावसामुळे सामना बराचकाळ थांबला होता. पासवाने उसंत घेतल्यानंतर ब्रेथवेटने जेरमाईन ब्लॅकवूड सोबत भागीदारी रचण्याचा प्रयत्न केला.

मात्र रविंचंद्रन अश्विनने ब्रेथवेटला 75 धावांवर बाद करत भारताला मोठा दिलासा दिला. दुसऱ्या सत्रात रविंद्र जडेजाने 20 धावांवर खेळणाऱ्या जेरमाईन ब्लॅकवूडला पॅव्हेलियनचा रस्ता दाखवत विंडीजला चौथा धक्का दिला. तर मोहम्मद सिराजने जोशुआ डि सेल्वाचा 10 धावांवर त्रिफळा उडवत भारताला पाचवे यश मिळवून दिले.

मात्र तोपर्यंत अलिक अथनाझेने विंडीजला 200 पार पोहचवले होते. त्याने जेसन होल्डरसोबत भागीदारी रचत विंडीजला दिवस अखेर 229 धावांपर्यंत मजल मारून दिली.

(Sports Latest News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

China criticizes US: भारताची बाजू घेत चीनने पुन्हा एकदा अमेरिकेवर केली उघडपणे टीका, म्हटले...

Rohit Sharma कर्णधार म्हणून कसा आहे? राहुल द्रविडने स्पष्टच सांगितले; म्हणाला, 'मला नेहमीच जाणवलं तो...'

Donald Trump: अलास्कातून परतताना पुतिन यांनी इंधनासाठी २.२ कोटी रुपये रोखीने दिले; नेमकं काय घडलं?

Solapur News : मालमत्ता करदात्यांना सुवर्णसंधी! ३० सप्टेंबरपर्यंत व्याज-दंडात १००% सूट

Maharashtra Latest News Update: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT