Shimron Hetmyer And
Dwayne Bravo
Shimron Hetmyer And Dwayne Bravo  Twittter
क्रीडा

CPL : DJ ब्रावोवर हेटमायरनं उगारली बॅट; व्हिडिओ व्हायरल

सुशांत जाधव

CPL 2021 : आयपीलच्या दुसऱ्या टप्प्यातील हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी कॅरेबियन प्रिमीयर लीगचा (Caribbean Premier League 2021 ) थरार रंगल्याचे पाहायला मिळत आहे. कॅरेबियन क्रिकेट लीगच्या मैदानात धावांची बरसात आणि गोलंदाजांची जादू अनुभवायला तर मिळतच आहे. पण त्यासोबतच काही मनोरंजक गोष्टीचा नजराणाही दिसून येतोय.

या स्पर्धेतील आठव्या सामन्यातील एक व्हिडिओ सध्या तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मैदानात नेमक काय सुरु आहे. त्यामागचं कारण काय असाव असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडू शकतो. गयाना वॉरियर्स आणि सेंट किट्स अँण्ड पॅट्रियट्स (St Kitts and Nevis Patriots vs Guyana Amazon Warriors) यांच्यातील सामन्यादरम्यान एक अनोखी घटना घडल्याचे चित्र पाहायला मिळाले.

गयाना वॉरियर्सच्या डावातील 13 व्या षटकात ब्रावो (Dwayne Bravo) गोलंदाजी करत असताना मैदानात कोलमडला. त्यावेळी फलंदाजी करत असलेल्या शिमरॉन हेटमायरने (Shimron Hetmyer) धाव घेण्यासाठी क्रीज सोडले. अर्धे क्रिज पार केल्यानंतर हेटमायरने ब्रावोवर बॅटच उगारली. यासंदर्भातील व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. दोन्ही संघातील खेळाडूत काहीतरी बिनसल्याचे वातावरण थोड्यावेळासाठी निर्माण झाले होते.

पण हा प्रकार घडल्यानंतर हेटमायर आणि त्याचा सहकारी हफिजने ब्रावोला हात देऊन उठवल्याचेही पाहायला मिळाले. त्यामुळे बॅट उगारण्याचा प्रकार हा गंमतीशीरपणे केल्याचे स्पष्ट झाले. फलंदाज आणि गोलंदाज यांच्यातील गळाभेटीनं मैदानात काही राडा झाला नाही तर दोस्तीचा तो अनोखा सोहळा होता असेच काहीसे चित्र समोर आले. सामन्याचे बोलायचे तर सेंट किट्स अँण्ड पॅट्रियट्सने हा सामना 6 गडी राखून जिंकला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: सभेला येतो पण मराठी माणूस मनसेला मतं का देत नाही? राज ठाकरेंनी दिल उत्तर...

Retinal Detachment : तुम्हाला ही झालाय का राघव चड्ढांसारखा ‘हा’ आजार? डोळ्यांशी संबंधित ‘या’ सुरूवातीच्या लक्षणांबद्दल जाणून घ्या

Pune School: स्कॉलरशीपची परीक्षा पास पण शाळा निकालच देईनात; महापालिकेचा भोंगळ कारभार

MI Playoff Scenario : 8 सामने हरल्यानंतरही मुंबई इंडियन्स प्लेऑफमध्ये जाऊ शकते का? समजून घ्या समीकरण

Latest Marathi News Live Update : काँग्रेस उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट

SCROLL FOR NEXT