Wimbledon 2024 Carlos Alcaraz vs Novak Djokovic mens singles final sakal
क्रीडा

Wimbledon 2024 Final : जोकोविच बदला घेणार की कार्लोसचा 'राज' कायम राहणार? आज रंगणार विम्बल्डनचा फायनल थरार

Carlos Alcaraz vs Novak Djokovic : विम्बल्डन पुरुषांच्या अंतिम सामन्यात आज गतविजेता कार्लोस अल्काराझ आणि माजी विजेता नोवाक जोकोविच यांच्यात सामना होत आहे. गतवर्षीही हेच दोन प्रतिस्पर्धी एकमेकांविरुद्ध लढले होते.

Kiran Mahanavar

विम्बल्डन पुरुषांच्या अंतिम सामन्यात आज गतविजेता कार्लोस अल्काराझ आणि माजी विजेता नोवाक जोकोविच यांच्यात सामना होत आहे. गतवर्षीही हेच दोन प्रतिस्पर्धी एकमेकांविरुद्ध लढले होते.

काल झालेल्या उपांत्य सामन्यात स्पेनच्या अल्काराझने रशियाच्या डॅनिल मेदवेदेवचा ६-७, ६-३, ६-४, ६-४ असा पराभव केला तर जोकोविचने इटलीच्या लॉरेन्झो मुसेट्टीचे आव्हान तीन सेटमध्ये ६-४, ७-६, ६-४ असे मोडून काढले. उपांत्य फेरीचे हे सामने तसे एकतर्फीच झाले. मात्र, उद्या अंतिम सामन्यात कडवा प्रतिकार अपेक्षित आहे. गतवर्षी अल्काराझने पाच सेटच्या चिवट झुंजीनंतर जोकोविचचा पराभव केला होता. विम्बल्डनच्या सेंटर कोर्टवर जोकोविचचा प्रदीर्घ कालावधीनंतर तो पराभव झाला होता.

उपांत्य फेरीतील एकतर्फी विजयावर मी समाधानी आहे; पण आत्मसंतुष्ट राहणार नाही. विजयाच्या करंडकावर माझे हात असायला हवेत, असे मनोमन इच्छा आहे, असे जोकोविचने उपांत्य सामना जिंकल्यानंतर सांगितले. मॅच विनिंग गुण मिळवल्यानंतर जोकोविच रॅकेटवर व्हायोलिन वाजवल्याची कृती करत असतो, पण उपांत्य सामना जिंकल्यानंतर त्याने ही कृती केली नाही.

अल्काराझ हा सध्याचा सर्वात प्रभावी तरुण खेळाडू आहे. त्याच्यासारखी गुणवत्ता मी पाहिलेली नाही. त्याच्याकडे अनेक ग्रँडस्लॅम जिंकण्याची क्षमता आहे; परंतु उद्या त्याचा दिवस नसावा, असेही जोकोविच म्हणाला.

अल्काराझने आत्तापर्यंत चार ग्रँडस्लॅम जिंकलेली आहेत. जोकोविच गत स्पर्धेतील पराभवाची परतफेड करण्यासाठी अधिक प्रयत्न करू शकेल. जोकोविचसाठी अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास अपेक्षेनुसार झाला, मात्र अल्काराझसाठी चढ-उतार येत राहिले. तिसऱ्या फेरीनंतर प्रत्येक सामन्यात त्याने एक सेट गमावलेला आहे.

रिपिट अंतिम सामना

गत स्पर्धेत अंतिम सामन्यात खेळलेले प्रतिस्पर्धी पुढच्या वर्षीही एकमेकांविरुद्ध लढण्याची विम्बल्डनमधील ही दुसरी वेळ आहे. २०१४ आणि २०१५ मध्ये रॉजर फेडरर आणि जोकोविच एकमेकांविरुद्ध खेळले होते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Ranji Trophy: ८ चौकार अन् ३ षटकार... रिंकू सिंगचं खणखणीत नाबाद शतक; टीम इंडियात पुनरागमनासाठी ठोकली दावेदारी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

SCROLL FOR NEXT