Carlos Alcaraz | Wimbledon 2024 X/Wimbledon
क्रीडा

Wimbledon 2024 मध्येही अल्काराजचेच वर्चस्व! सलग दुसऱ्यांदा जोकोविचला बालेकिल्ल्यात Final मध्ये पराभवाचा धक्का

Carlos Alcaraz: स्पेनच्या २१ वर्षीय कार्लोस अल्काराजने नोव्हाक जोकोविचला पराभूत करत सलग दुसऱ्यांदा विम्बल्डन विजेतेपदावर नाव कोरले.

Pranali Kodre

Carlos Alcaraz vs Novak Djokovic: लंडनमध्ये झालेल्या विम्बल्डन २०२४ स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद २१ वर्षीय कार्लोस अल्काराजने मिळवले. त्याने अंतिम सामन्यात दिग्गज नोव्हाक जोकोविचला पराभूत केले.

स्पेनच्या अल्काराजने सातवेळच्या विम्बल्डन विजेत्या जोकोविचला अंतिम सामन्यात ६-२, ६-२, ७-६ (७-४) अशा सरळ तीन सेटमध्ये पराभूत केले.

अल्काराजचे हे एकूण चौथे ग्रँडस्लॅम, तर दुसरे विम्बल्डन विजेतेपद आहे. लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की अल्काराजने दोन्ही विम्बल्डन विजेतीपदं अंतिम सामन्यात जोकोविचला पराभूत करत जिंकले आहे.

अल्काराजने यापूर्वी अमेरिका ओपन २०२२ आणि फ्रेंच ओपन २०२४ या ग्रँडस्लॅम स्पर्धांचेही विजेतेपद जिंकले आहे.

अल्काराजचे वर्चस्व

रविवारी २ तास २७ मिनिटे चाललेल्या अंतिम सामन्यात अल्काराजने पहिल्या दोन्ही सेटमध्ये जोकोविचवर पूर्ण वर्चस्व ठेवले होते. पहिल्या दोन्ही सेटमध्ये त्याची सर्व्हिस जोकोविचला भेदता आली नाही.

पण तिसऱ्या सेटमध्ये जोकोविचने चांगले पुनरागमन केलं, त्याने स्वत:ची सर्व्हिस तर राखलीच पण चॅम्पियनशीपसाठीच्या पाँइटसाठी अल्काराज खेळत असताना जोकोविचने त्याला रोखत गेम जिंकला. अखेर हा सेट टायब्रेकमध्ये गेला. टायब्रेकमध्येही अल्काराज जोकोविचवर भारी पडला.

लक्षात घेण्यासारखी गोष्ट अशी की गेल्याच महिन्यात जोकोविचची गुडघ्याची शस्त्रक्रिया झाली होती. त्यानंतरही त्याने विम्बल्डनच्या अंतिम सामन्यापर्यंत पोहचण्याचा पराक्रम केल्याने त्याचेही कौतुक होत आहे.

अल्काराज दिग्गजांमध्ये सामील

दरम्यान, साल १९६८ नंतर एकाच वर्षात फ्रेंच ओपन आणि विम्बल्डन जिंकणारा तो रॉड लेव्हर, ब्योर्न बॉर्ग, राफेल नदाल, रॉजर फेडरर आणि नोवाक जोकोविच यांच्यानंतरचा सहावा खेळा़डू ठरला आहे.

तसेच अल्काराजने आत्तापर्यंत चार वेळा ग्रँडस्लॅम स्पर्धेच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे आणि या चारही अंतिम सामन्यात त्याने विजेतेपद जिंकले आहे. ओपन एरामध्ये असा पराक्रम करणारा तो दुसराच पुरुष टेनिसपटू आहे. यापूर्वी रॉजर फेडररने त्याचे पहिले सात ग्रँडस्लॅम अंतिम सामने जिंकले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sinhagad Road Traffic Jam : पुण्यातील सिंहगड रोडवर वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा, ऑफिसच्या दिशेने निघालेल्यांना मनस्ताप

Mumbai CNG Shortage: सीएनजी कोंडीतून मुंबईकरांची सुटका, पुरवठा सुरळीत होताच पंपांवर गर्दी; ३ दिवसात कोट्यवधींचं नुकसान

Latest Marathi Breaking News Live Update : 'आमच्या विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची निवड सर्वसंमतीने केली जाईल'- भाजप नेते तारकिशोर प्रसाद

'दादा फक्त तुमच्यामुळं शक्य झालं...' गृहप्रवेशानंतर सुरजने मानले अजित पवारांचे आभार, दादांनी कमेंट्स करत दिल्या हटके शुभेच्छा

भाजपकडून तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातल्या आरोपीला नगराध्यक्षपदाची उमेदवारी, अटकेनंतर होता तुरुंगात, सध्या जामीनावर बाहेर

SCROLL FOR NEXT