Casteist BCCI Suryakumar Yadav esakal
क्रीडा

BCCI जातीयवादी; सोशलवर ट्रेंड होणाऱ्या #Casteist_BCCI या हॅशटॅगचा सूर्याशी काय आहे संबंध?

अनिरुद्ध संकपाळ

Casteist BCCI Suryakumar Yadav : बीसीसीआयने नुकतेच बांगलादेश दौऱ्यावरील वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा केली. या संघात हार्दिक पांड्या आणि सूर्यकुमार यादव यांना संघात स्थान देण्यात आलेले नाही. याबाबत बीसीसीआयकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. सूर्यकुमार यादव सध्या न्यूझीलंडमध्ये असून तो या दौऱ्यावरील वनडे मालिकेत खेळणाऱ्या भारतीय संघाचा भाग आहे. मात्र त्याला बांगलादेशविरूद्धच्या मालिकेसाठी संघात स्थान देण्यात आलेले नाही. यावरूनच सोशल मीडियावर काही चाहत्यांनी #Casteist_BCCI हा ट्रेंड सुरू केला आहे. या ट्रेंडवर नंतर संजू सॅमसनच्या नावानेही अनेक ट्विट करण्यात आले आहेत.

बीसीसीआयने काल (दि.23) बांगलादेश विरूद्धच्या वनडे मालिकेसाठी संघाची घोषणा केली. त्यावेळी संघात सूर्यकुमार यादवचे नाव नसल्याचे पाहून द प्रींट या वेबसाईटसाठी स्तंभलेखन करणाऱ्या दिलीप मंडल यांनी एक ट्विट केले. त्यानंतरच सोशल मीडियावर #Casteist_BCCI यावेळी त्यांनी सूर्यकुमार यादवचा न्यूझीलंडमध्ये मालिकावीराने गौरव झालेला फोटो शेअर करत त्याला 'मग हा संघाच्या बाहेर का आहे? संघात स्थान मिळवण्यासाठी त्याला काय करावे लागणार? आपले आडनाव बदलावे का? #Casteist_BCCI' असे कॅप्शन दिले. यानंतर ट्विटरवर Casteist_BCCI चा ट्रेंड जोर पकडू लागला.

बांगलादेश दौऱ्यासाठीचा भारतीय वनडे संघ पुढीप्रमाणे :

रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), शिखर धवन, विराट कोहली, रजत पाटीदार, श्रेयस अय्यर, राहुल त्रिपाठी, ऋषभ पंत, इशान किशन, शाहबाज अहमद, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, दीपक चाहर, कुलदीप सेन.

हेही वाचा : मुदत ठेवीच्या मुद्दलातून टीडीएस कपात? इथे करा तक्रार...

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT