Joshua Burt’s esakal
क्रीडा

Paris Olympic 2024 Hockey : 'चक दे इंडिया'तील Joshua Burt भारतीय हॉकी संघासाठी ठरला खलनायक, रोहिदासच्या बंदीच्या निर्णयाशी थेट संबंध

Paris Olympic 2024 Hockey - भारताच्या पुरुष हॉकी संघाने ऑलिम्पिक स्पर्धेच्या उपांत्य फेरीत धडक दिली, परंतु त्यांना मोठा धक्काही बसला. चक दे इंडिया चित्रपटात काम करणाऱ्या अभिनेत्यामुळे टीम इंडियाला हा धक्का बसला आहे.

Swadesh Ghanekar

Paris Olympic 2024 Amit Rohidas : भारतीय पुरुष हॉकी संघाच्या पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील प्रवासाला बॉलिवूड चित्रपट 'चक दे इंडिया'तील एका अभिनेत्यामुळे नाट्यमय वळण मिळाले आहे. चक दे इंडिया चित्रपटात ऑस्ट्रेलियन महिला संघाच्या प्रशिक्षकाची भूमिका करणारे जोशुआ बर्ट ( Joshua Burt) हे नाव सध्या हॉकी वर्तुळात चर्चेत आहे. भारताचा प्रमुख बचावपटू अमित रोहिदास याच्यावरील एका सामन्याच्या बंदीचा या जोशुआ याचा थेट संबंध आहे. जोशुआ हे आंतरराष्ट्रीय हॉकी फेडरेशनच्या तांत्रित समितीस आहेत आणि त्यांनी अमित रोहिदासच्या बंदीचा निर्णय घेतला. त्यामुळे त्याला उपांत्य फेरीच्या सामन्यात खेळता येणार नाही.

रेड कार्ड अन् निलंबनाची कारवाई..

भारत-ग्रेट ब्रिटन यांच्यात उपांत्यपूर्व फेरीचा सामना रविवारी झाला आणि पेनल्टी शूट आऊटमध्ये भारताने ४-२ ( १-१) अशी बाजी मारली. उपांत्य फेरीत भारतासमोर जर्मनीचे आव्हान असणार आहे. दरम्यान, ग्रेट ब्रिटनविरुद्धच्या लढतीत प्रतिस्पर्धी खेळाडूला अमित रोहिदासची स्टीक अनावधानाने लागली.. मात्र, मैदानावरील अम्पायरने त्याला रेड कार्ड दाखवून बाहेर केले. त्यामुळे त्याला ६ ऑगस्टला जर्मनीविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या लढतीला मुकावे लागेल. हॉकी इंडियाने या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती.

रोहिदासचे निलंबन ही भारतासाठी खूप मोठी धक्कादायक गोष्ट आहे. तो संघाच्या बचावफळीतील खूप महत्त्वाचा खेळाडू आहे आणि त्याची दमदार कामगिरी सुरू आहे. उपांत्य फेरीत तो भारताच्या १६ सदस्यीय संघाचा भाग नसेल. त्यामुळे संघाला फक्त १५ खेळाडूंसह खेळावे लागणार आहे. जर्मनीविरुद्ध भारताला या गोष्टीचा मोठा फटका बसणार आहे. भारताने टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते आणि आता त्यांचे लक्ष्य सुवर्णपदक आहे.

जोशुआ बर्ट याने प्रथमच भारताला धक्का दिलेला नाही. ऑक्टोबर २०११ मध्ये ऑस्ट्रेलियात झालेल्या तिरंगी मालिकेत बर्ट याने भारताच्या पाच खेळाडूंना निलंबित करण्याचा प्रस्ताव ठेवला होता. त्यात कोच जुगराज सिंग व मॅनेजर डेव्हिड जोन्स यांचा समावेश आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Update : अचानक फोनची कॉलिंग स्क्रीन वेगळी दिसतेय? पटकन जाणून घ्या तुमच्या मोबाईलला काय झालंय

Ganeshotsav : ठाणे रेल्वे स्थानकावर मोठी गर्दी, गणेशभक्त तब्बल २५ तास रांगेत उभे, कोकणात जाण्यासाठी तिकीट मिळेना

Glycemic Index: मधुमेही खजूर खाऊ शकतात का? जाणून घ्या तज्ज्ञ काय म्हणतात

Sunil Gavaskar: क्रिकेटमध्ये सर्वच विद्यार्थी, गावसकर; कोणीही मास्टर नसतो ! वानखेडेवर शरद पवार संग्रहालयाचे उद्घाटन

Crime News: डोळ्यांदेखत पतीवर चाकूचे १६ वार, मला न्याय द्या! कुटुंबावरील हल्ल्यात खून झालेल्या प्रमोदच्या पत्नीची पोलिसांना विनंती

SCROLL FOR NEXT