Chambal Region Cricketer Anuj Took 10 Wickets  esakal
क्रीडा

Domestic Cricket Record : चंबळच्या खोऱ्यातला अनिल कुंबळे! हॅट्ट्रिकसह एका डावात घेतल्या 10 विकेट्स

अनिरुद्ध संकपाळ

Chambal Region Cricketer Anuj : चंबळचं खोरं म्हटलं की सर्वांसमोर दरोडेखोर, फुलनदेवी येते. मात्र याच चंबळच्या खोऱ्याची ओळख बदलण्याचं काम युवा क्रिकेटपटू अनुजने केले. त्याने भारताचा महान माजी फिरकीपटू अनिल कुंबळेसारखी कामगिरी करत स्वतःचे आणि चंबळचे नाव देखील देशाच्या कानाकोपऱ्यात पोहचवले. मध्य प्रदेशातील एका स्पर्धेत अनुजने चंबळकडून खेळताना उज्जैनचा संपूर्ण संघच बाद केला.

मध्य प्रदेशातील 15 वर्षाखालील एमएम जगदाळे ट्रॉफीमध्ये चंबळ आणि उज्जैन यांच्यात सामना झाला. चंबळने प्रथम फलंदाजी केल्यानंतर उज्जैन धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरली. मात्र चंबळच्या अनुज सविताने आपल्या गोलंदाजीने उज्जैनच्या फलंदाजांमध्ये असा काही दरारा निर्माण केला की त्यांनी त्याच्या समोर सपशेल गुडघे टेकले. अनुजने 10.3 षटकात 24 धावा देत 10 विकेट्स घेतल्या. त्याने 3 षटके निर्धाव देखील टाकली.

अनुजने 10 विकेट्सबरोबर हॅट्ट्रिकही साधली

अनुजने फक्त 10 षटकात 10 विकेट्स घेतल्या नाहीत तर त्याने शेवटच्या तीन विकेट्स सलग घेत हॅट्ट्रिक देखील साधली. उनुजच्या फिरकीपुढे उज्जैनने 119 धावातच गुडघे टेकले. चंबळने हा सामना 290 धावांनी जिंकला. अनुजने पहिल्या डावात देखील 6 विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे त्याच्या सामन्यात 16 विकेट्स झाल्या. यापूर्वी उज्जैनचा लेग स्पिनर पलाश कोचरने होशंगाबाद विरूद्ध एका डावात 10 विकेट्स घेतल्या होत्या. (Sports Latest News)

कसोटीत तीन गोलंदाजांनी घेतल्या एका डावात 10 विकेट्स

- भारताकडून अनिल कुंबळे यांनी पाकिस्तानविरूद्ध 1998 - 99 मध्ये एका डावात 10 विकेट्स घेतल्या होत्या.

- यापूर्वी इंग्लंडचे जिम लॅकर यांनी ऑस्ट्रेलियाविरूद्ध 1956 मध्ये एका डावात 10 विकेट्स घेतल्या होत्या.

- 2021 मध्ये भारताविरूद्ध झालेल्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडच्या एजाज पटेलने 10 विकेट्स घेण्याची किमया साधली होती.

हेही वाचा : प्राचीन काळातली शस्त्रनिर्मिती कला....

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj-Uddhav Thackeray : एकत्र आले पण एकत्र राहणार का? राज ठाकरेंच्या आदेशामुळे युतीबाबत संभ्रम

Stock Market Opening: शेअर बाजाराची सपाट सुरुवात; सेन्सेक्स 34 अंकांनी घसरला, बाजारात दबाव का दिसून येत आहे?

Tulsi Water Benefits: सकाळी तुळशीचे पाणी प्यायल्याने पावसाळ्यात 'या' 4 आजारांवर होईल मात

मराठमोळ्या गाण्यावर सोनालीचे इंग्लंडमध्ये ठुमके, कवितेवर केला हटके डान्स, व्हिडिओ व्हायरल

दादरची 'ती' ओळख होणार इतिहासजमा! अनेक दशकांपासून अस्तित्वात असलेल्या कबुतरखान्याचा शेवटचा Video व्हायरल, लोक हळहळले

SCROLL FOR NEXT