messi neymar fail kylian mbappe injured 
क्रीडा

Champions League : मेस्सी-नेमार-एम्बापे खेळूनही पीएसजीची बरोबरी

संपूर्ण फुटबॉल विश्व ही त्रयी एकत्रित कसा खेळ करते याची आतुरतेने वाट पाहत होते, पण मेस्सीचा एक फटका बारला लागून बाहेर गेला, त्यानंतर त्याला यलो कार्डही दाखवण्यात आले.

सकाळ वृत्तसेवा

जीनेव्हा : लिओनेल मेस्सी, नेमार आणि एम्बाबे असे सुपरस्टार एकत्रित खेळण्याचा योग जुळून आला, परंतु चॅम्पियन्स लीगच्या लढतीत पीएसजीला बेल्जियमचा फारसा प्रसिद्ध नसलेल्या ब्रुग या क्लबविरुद्ध 1-1 अशा बरोबरीवर समाधान मानावे लागले.मेस्सी-नेमार-एम्बापे असे निष्णांत स्ट्रायकर असताना पीएसजीचा गोल अँदर हेरेराने केला. त्यामुळे त्यांच्यावरची पराभवाची नामुष्की तरी टळली.

संपूर्ण फुटबॉल विश्व ही त्रयी एकत्रित कसा खेळ करते याची आतुरतेने वाट पाहत होते, पण मेस्सीचा एक फटका बारला लागून बाहेर गेला, त्यानंतर त्याला यलो कार्डही दाखवण्यात आले. एम्बापेचा डावा गुडघा दुखावल्यामुळे त्याला सामना अर्धवट सोडून बाहेर जावे लागले. एकूणच या तिघांची भट्टी सलामीच्या सामन्यात तरी जमली नाही.

चॅम्पियन्स लीगच्या इतर सामन्यात सेबास्टिन हॅलेरने अजेक्सच्या 5-1 अशा विजयात चार गोल केले. त्यांनी स्पोर्टिंग लिसबनला हरवले, तर मँचेस्टर सिटीने लेपिझिंगचा 6-3 असा पराभव केला. लिव्हरपूलने एसी मिलानवर 3-2 अशी मात केली. एसी मिलान हा इटलीतील क्लब सात मोसमानंतर चॅम्पियन्स लीगसाठी पात्र ठरला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SRH vs RR Live: इशान किशन बरसला, हेनरिच क्लासनही जबरदस्त खेळला; पण, राजस्थानच्या गोलंदाजांचे पुनरागमन, नितीश रेड्डी भिडला

MPSC पदसंख्या वाढ, मेडिकल कौन्सिल नियमांमध्ये बदल अन्...; मंत्रिमंडळ बैठकीत महायुती सरकारचे ८ महत्त्वाचे निर्णय

MPSC Success Story: पहुरजिऱ्याचा अजय दिघडेचा पराक्रम; MPSC उत्तीर्ण होऊन असिस्टंट कमिशनर पदावर झेप, आई-वडिलांच्या कष्टांना यशाची किनार..

SRH vs RR Live: इशान किशनचे शतक थोडक्यात हुकले! पण, जिंकली Orange Cap; झेल घेताना दोन खेळाडू एकमेकांना आपटले

Gadchiroli Health: कोरची तालुक्यात गरोदर मातेसह बाळाचा मृत्यू; आशा वर्करची टाळाटाळी, रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता अन्..

SCROLL FOR NEXT