CK Nayudu Trophy sakal
क्रीडा

CK Nayudu Trophy : पहिल्या डावात चंडीगड संघाला ५० धावांची आघाडी

चंडीगड येथे सुरू झालेल्या कर्नल सी. के. नायडू करंडक (२३ वर्षांखालील) साखळी क्रिकेट स्पर्धेत अर्जुन आझादने झळकाविलेल्या १७८ धावांच्या जोरावर चंडीगडला पहिल्या डावात ५० धावांची आघाडी मिळविता आली

सकाळ वृत्तसेवा

पुणे : चंडीगड येथे सुरू झालेल्या कर्नल सी. के. नायडू करंडक (२३ वर्षांखालील) साखळी क्रिकेट स्पर्धेत अर्जुन आझादने झळकाविलेल्या १७८ धावांच्या जोरावर चंडीगडला पहिल्या डावात ५० धावांची आघाडी मिळविता आली चंडीगडचा डाव ३३० धावांत संपुष्टात आल्यानंतर दुसऱ्या दिवसअखेर महाराष्ट्राने दुसऱ्या डावात बिनबाद आठ धावा केल्या आहेत.

चंडीगड येथील सेक्टर नंबर १६ च्या मैदानावरील या चार दिवसीय लढतीत महाराष्ट्राचा पहिला डाव काल २८० धावांत आटोपला. आज चंडीगडने डावास सुरवात केली .चंडीगडच्या एकूण धावसंख्येतील १७८ धावांचा वाटा एकट्या अर्जुन आझाद होता. अर्जुन आझादने २१३ चेंडूंत १७ चौकार, एका षटकारासह आपली खेळी सजवली.अर्जुन आझाद व आक्षत राणा या जोडीने पाचव्या विकेटकरिता ११५ धावांची भागीदारी केली होती. महाराष्ट्राकडून अभिषेक निशादने पाच गडी बाद केले. महाराष्ट्राने दुसऱ्या डावात दुसऱ्या दिवशीचा खेळ थांबला तेव्हा बिनबाद ८ धावा केल्या होत्या. अथर्व धर्माधिकारी ८ धावांवर तर अनिरुद्ध साबळे शून्यावर खेळत होता.

धावफलक :

महाराष्ट्र - पहिला डाव - (८८.२ षटकांत) सर्वबाद २८० (हर्षल काटे १५०, अनिकेत नलावडे ५९, अमित शुक्ला ३-७५, निशुक बिर्ला ३-१०२, राजनगडा बावा २-४२) आणि दुसरा डाव - (२ षटकांत) बिनबाद ८ धावा विरुद्ध चंडीगड - पहिला डाव - (८५.४ षटकांत) सर्वबाद ३३० (अर्जुन आझाद १७८, आक्षत राणा ४०, हर्षीत २९, प्रशांत अहलावत २५, हरनूरसिंग २२, अभिषेक निशाद ५-८०, सिद्धेश वीर ३-६७, विकी ओस्तवाल १-१०२).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

VVS Laxman: गौतम गंभीर नाही, आशियाई क्रीडा स्पर्धेत VVS लक्ष्मण सांभाळणार टीम इंडियाची धुरा ?; BCCIचा मोठा निर्णय

Gondia News: ‘डॉक्टरांनी बाळाची एकदाही तपासणी केली नाही’; तीन दिवसांच्या नवजात बाळाचा मृत्यू, हलगर्जीपणाचा आईचा आरोप

Philips 5G Smartphone: IP64 रेटिंगसह लाँच! 5700mAh बॅटरी अन् 64MP कॅमेरा; पाहा किंमत आणि भन्नाट फीचर्स..

Marathi News Live Updates : ईडीचे कोलकातामधील ११ ठिकाणी छापे

Bihar Jharkhand Water Dispute: बिहार-झारखंडमधील २५ वर्षांचा तंटा मिटला; सोन नदीच्या पाणीवाटपावर अखेर एकमत, अधिक फायदा कोणाला?

SCROLL FOR NEXT