Chennai Super Kings New Jersey
Chennai Super Kings New Jersey sakal
क्रीडा

IPL 2022 : CSK ची नवी जर्सी पाहिलीत का?

Kiran Mahanavar

IPL CSK 2022 : इंडियन प्रीमियर लीगचे (IPL ) कप चार वेळा जिंकणारा चेन्नई सुपर किंग्ज पुन्हा एकदा नव्या हंगामासाठी सज्ज झाला आहे. IPL 2022 च्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स (CSK) कोलकाता नाईट रायडर्स (KKR) विरुद्ध 26 मार्च रोजी खेळणार आहे. टूर्नामेंट सुरू होण्यापूर्वी चेन्नई सुपर किंग्जने त्यांची नवीन जर्सी लाँच केली आहे.(Chennai Super Kings New Jersey)

चेन्नई सुपर किंग्ज (CSK New Jersey) ने लाँच केलेल्या जर्सीत अनेक नवीन गोष्टी जोडल्या गेल्या आहेत. संघाच्या लोगोच्या समोर चार तारे लावण्यात आले आहेत, जे चार वेळा ट्रॉफी दर्शवितात. याशिवाय खेळाडूंना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये यासाठी खांद्यावर नवीन डिझाइन करण्यात आले आहे. चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या जर्सीत फारसा बदल केलेला नाही. फक्त जर्सीचा स्पॉन्सर बदलण्यात आला आहे, यावेळी जर्सीच्या पुढील बाजूस TVS Eurogrip लोगो आहे . 2021 मध्येच, चेन्नई सुपर किंग्जने त्यांच्या जर्सीत भारतीय सैन्याला श्रद्धांजली देत, खांद्याच्या भागामध्ये सैन्याच्या डिझाइनचा एक भाग जोडला आहे.

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई सुपर किंग्जची गणना स्पर्धेतील सर्वोत्तम संघांमध्ये केली जाते. चार खिताब तसेच अनेक वेळा प्लेऑफ आणि फायनलमध्ये स्थान मिळवले आहे. एमएस धोनी यावेळीही आपल्या संघाची कमान सांभाळणार आहे. चेन्नई यंदाच्या हंगामात आपल्या पाचव्या विजेतेपदासाठी जोर लावेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Loksabha Election 2024 : राज्यातील मतदारसंघांत कुठे रांगा, तर कुठे निरुत्साह

Loksabha Election 2024 : कासवगतीने कासावीस! मतदार चार तास रांगेत

Monsoon : पावसाचा जोर, केरळ ‘अलर्ट मोड’वर

BSP Party : बसपची अस्तित्वाची लढाई; मायावतींचा दबदबा झपाट्याने कमी होऊ लागला

Uddhav Thackeray : मतदान केंद्रात मतदारांकडे दोन ते तीन वेळा ओळखपत्र विचारून ‘जाणीवपूर्वक विलंब’

SCROLL FOR NEXT