chennai super kings increased fans heartbeat by sharing-ms dhoni-video-at-7 29 pm  sakal
क्रीडा

MS Dhoni : धोनीचा 7 वाजून 29 मिनिटांचा व्हिडिओ व्हायरल! चाहत्यांचे वाढवले हृदयाचे ठोके

Kiran Mahanavar

IPL 2023 MS Dhoni : एमएस धोनी हा क्रिकेट इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार मानला जातो. त्याने भारताला तीन आयसीसी टूर्नामेंटमध्ये विजय मिळवून दिला आहे, ज्यामुळे तो महान कर्णधारांच्या यादीत आघाडीवर आहे. याशिवाय त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने इंडियन प्रीमियर लीगमध्ये 4 विजेतेपदे जिंकली आहेत.

जेव्हा जेव्हा घड्याळाची सुई 7.29 मिनिटांपर्यंत पोहोचते तेव्हा भारतीय चाहत्यांच्या मनात फक्त महेंद्रसिंग धोनी येतो. कारण 15 ऑगस्ट 2020 मध्ये धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. धोनीने ट्विटरवर 'मैं पल दो पल का शायर' या गाण्यासोबतच्या काही जुन्या आठवणींचा व्हिडिओ पोस्ट केला आणि लिहिले की, मला 7.29 मिनिटांपासून निवृत्त समजले जावे.

टीम चेन्नई सुपर किंग्सने त्याचवेळी त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ पोस्ट करून चाहत्यांना मोठा धक्का दिला आहे. व्हिडिओ पोस्ट करताना CSK ने लिहिले, 'धला अपडेट 7.29 मिनिटांवर'

जेव्हा चाहत्यांनी सीएसकेची ही पोस्ट पाहिली तेव्हा हृदयाचे ठोके वाढले असतील, पण त्यांनी व्हिडिओ प्ले केला तेव्हा त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला असेल. खंर तर चेन्नई सुपर किंग्जने शेअर केलेल्या या व्हिडिओमध्ये धोनीच्या निवृत्तीची कोणतीही बातमी नाही, परंतु माही आगामी आयपीएल हंगामाची तयारी करताना दिसत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut : कर्जाच्या पैशातून मोदींचा केक कापणार? वाढदिवस साजरा करणे म्हणजे आर्थिक गुन्हा, संजय राऊतांचे राज्य सरकारवर ताशेरे

Latest Marathi News Updates : कांद्याचे दर घसरले, शेतकऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

जरा आवरा अन् Google Gemini ला स्वत:चे पर्सनल फोटो देण्यापूर्वी ही बातमी वाचा... नाहीतर वेळ निघून जाईल, तज्ज्ञांचा इशारा

कलाकार हवा तर असा ! दशावतारचं यश पाहून हिंदी मीडियाने केलं दिलीप प्रभावळकरांचं कौतुक "बॉलीवूडला लाज वाटायला.."

Rahuri Accident: 'दुचाकींच्या अपघातात एक ठार, एक जखमी'; दोन भरधाव दुचाकींची समोरासमोर भीषण धडक

SCROLL FOR NEXT