Magnus Carlsen sakal
क्रीडा

Magnus Carlsen : विश्वविजेत्या कार्लसनचा निमनवर गंभीर आरोप

खेळताना फसवरणूक करणाऱ्याविरुद्ध कधीच खेळणार नाही

सकाळ वृत्तसेवा

ओस्लो : बुद्धिबळ विश्वविजेता ग्रँडमास्टर मॅग्नस कार्लसन याने अमेरिकन ग्रँडमास्टर हॅन्स निमनवर सामना खेळताना फसवणूक केल्याचा आरोप केला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून त्याने आपण हॅन्स निमनविरुद्ध माघार का घेतली याचा खुलासा केला आहे. तसेच आगामी काळात फसवणूक करणाऱ्या खेळाडूविरुद्ध आता कधीच खेळू इच्छित नाही, असेदेखील कार्लसन याने म्हटले आहे.

सेंट लुईस येथे सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला झालेल्या ‘सिंकफिल्ड कपमध्ये’ हॅन्स निमनविरुद्ध पराभवाचा धक्का बसल्यावर कार्लसने स्पर्धा अर्ध्यावर सोडली होती. त्यानंतर ‘ज्युलियस बेअर जनरेशन’ स्पर्धेत निमनविरुद्धच खेळताना फक्त एकच चाल खेळून त्याने सामना अर्धवट सोडला होता; या दोन घटनांमुळे मॅग्नस कार्लसन चेस जगतात चांगलाच चर्चेत आला होता.

हॅन्स निमनच्या फसवणुकीने खेळ करायच्या मुद्द्यावर मॅग्नस कार्लसन म्हणाला, की ‘‘आमच्यात सिंकफिल्ड कपमध्ये झालेल्या सामन्यातच मला निमन फसवणुकीने खेळतो याचा संशय आला होता.’’ ‘हॅन्स निमनने आपण १२ आणि १६ वर्षांचे असताना अप्रामाणिक खेळ करून समोरच्या खेळाडूची फसवणूक केल्याचे नुकतेच कबूल केले होते.’ हॅन्स निमनने ऑनलाईन पद्धतीने खेळवण्यात आलेल्या बुद्धिबळ स्पर्धेत अप्रामाणिकपणे खेळ केल्याचे कबूल केले आहे; मात्र निमन प्रत्यक्ष पटावर खेळवल्या जाणाऱ्या सामन्यात कशाप्रकारे अप्रामाणिक खेळ करेल याचा पुरावा कार्लसनने दिला नाहीय.

‘एलो’ गुणांच्या बाबतीत अमेरिकेचा निमन हा मॅग्नस कार्लसन पेक्षा २०० गुणांनी मागे आहे. कार्लसनने जगातील विविध बुद्धिबळ स्पर्धांच्या संयोजकांना आणि जागतिक बुद्धिबळ संघटनेला अप्रामाणिक खेळ करणाऱ्यांना रोखले जावे’’ अशी विंनती केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Virat Kohli Century : विराट कोहलीचा वर्ल्ड रेकॉर्ड! KKR विरुद्ध शतकी खेळी अन् आशियात कोणालाच न जमलेला केला पराक्रम...

IPL 2026 : चेन्नई सुपर किंग्सला खूप मोठा धक्का! मॅच विनर खेळाडूला दुखापत, उपचारासाठी लंडनला जाणार; स्पर्धेतून माघार निश्चित

IPL 2026 Playoff Scenario: विराट कोहलीचा झंझावात अन् RCB गुणतालिकेत अव्वल! KKR चे आव्हान संपले का? जाणून घ्या समीकरण

RCB VS KKR LIVE: विराट कोहलीची पहिली धाव अन् सेलिब्रेशन जणू Century सारखं, चाहत्यांना हसू आवरेना... Viral Video ची मजेशीर गोष्ट

Milk Rate Hike: महागाईचा आणखी एक फटका! अमूलनंतर मदर डेअरीनेही दूध दर वाढवले, किती रुपयांनी? बजेट कोलमडणार

SCROLL FOR NEXT