chess fide candidates 2024 gukesh beats vidit gujrathi to regain joint lead Sakal
क्रीडा

डी. गुकेशची विदित गुजराथीवर मात; अव्वल स्थानावर पुन्हा विराजमान

भारताचा युवा खेळाडू डी. गुकेश याने शनिवारी मध्यरात्री झालेल्या आव्हानवीरांच्या बुद्धिबळ स्पर्धेतील लढतीत भारताच्याच विदित गुजराथी याच्यावर मात करीत गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वल स्थानावर झेप घेतली.

सकाळ वृत्तसेवा

टोरंटो : भारताचा युवा खेळाडू डी. गुकेश याने शनिवारी मध्यरात्री झालेल्या आव्हानवीरांच्या बुद्धिबळ स्पर्धेतील लढतीत भारताच्याच विदित गुजराथी याच्यावर मात करीत गुणतालिकेत पुन्हा एकदा अव्वल स्थानावर झेप घेतली. गुकेश आता पाच गुणांसह इयान नेपोनियात्ची याच्यासह संयुक्तपणे पहिल्या स्थानावर विराजमान आहे.

डी. गुकेश - विदित गुजराथी यांच्यामधील आठव्या फेरीची लढत ३८ चालींनंतर संपली. गुकेशने या लढतीत वर्चस्व राखले. या लढतीत केलेल्या खेळाबद्दल गुकेशने समाधान व्यक्त केले. आर. प्रज्ञानंद - एलिरेझा फिरॉझा यांच्यामधील लढत ड्रॉ राहिली. प्रज्ञानंदने आठ सामन्यांमधून ४.५ गुणांची कमाई केली आहे.

नेपोनियात्चीने संधी गमावली

इयान नेपोनियात्ची याच्याकडे आठव्या फेरीच्या सामन्यात विजयाची संधी होती. या फेरीत त्याने निजात एबासोव याचा सामना केला. एबासोव या मालिकेत सध्या तळाला आहे. त्यामुळे त्याच्याविरुद्ध विजय मिळवणे गरजेचे होते. पण सुरुवातीलाच नेपोनियात्ची याच्याकडून चूक घडली. याचा फायदा एबासोव याने घेतला. ही लढत ड्रॉ राखण्यात त्याला यश मिळाले.

हिकारू नाकामुराचा विजय

दिग्गज खेळाडू हिकारू नाकामुरा याने या स्पर्धेतील आठव्या फेरीत झोकात पुनरागमन केले. त्याने शनिवारी झालेल्या लढतीत फॅबियानो कॅरुअना याच्यावर मात केली. यामुळे त्याला ४.५ गुणांची कमाई करता आली आहे. डी. गुकेश व इयान नेपोनियात्ची यांच्यानंतर गुणतालिकेत त्याचा क्रमांक आहे.

महिला विभागात चुरस

महिला विभागात चुरस निर्माण झाली आहे. लेई टिंगजी, ॲलेक्झँड्रा जी. व टॅन झोंगयी या तीन महिला खेळाडूंनी प्रत्येकी पाच गुणांची कमाई केली आहे. या स्पर्धेच्या आठ फेऱ्या अद्याप बाकी आहेत. दरम्यान, कोनेरू हम्पी हिने आर. वैशालीला पराभूत केले. हम्पीने ३.५ गुणांची कमाई केली असून वैशालीला २.५ गुणांवरच समाधान मानावे लागले आहे.

ताजी गुणतालिका (पुरुष विभा) ः १) डी. गुकेश (५ गुण) २) इयान नेपोनियात्ची (५ गुण) ३) हिकारू नाकामुरा (४.५ गुण) ४) आर. प्रज्ञानंद (४.५ गुण) ५) फॅबियानो कॅरुअना (४ गुण) ६) विदित गुजराथी (३.५ गुण) ७) एलिरेझा फिरॉझा (३ गुण) ८) निजात एबासोव (२.५ गुण).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नव्या मतदार नोंदणीसाठी महत्त्वाची बातमी! आता नोंदणीवेळी जुळवावी लागणार २४ वर्षांपूर्वीची वंशावळ; प्रशासनाला शोध सोलापुरातील ६ लाख मतदारांचा, वाचा...

Riddhi Thakkar: ‘लेट्स एक्सप्लोर बस्तर...’ २० बाइकरचा ग्रुप, सफरीचं स्वप्न ठरलं अखेरचं, अचानक काळाचा घाला; मुंबईच्या रिद्धीचा दुर्दैवी अंत

Khutbav Accident : नियतीचा खेळ, मृत्यूतही साधला मेळ; रक्षाबंधनापूर्वी बहीण-भावावर काळाचा घाला, पारगावात हळहळ

Talegaon Dabhade News : रस्ता नसल्याने ज्येष्ठाला उपचारासाठी झोळीतून नेण्याची वेळ

मोठी बातमी! मराठा समाजातील १.८१ लाख तरुण रोजगार मागणारे नव्हे रोजगार देणारे; ७ वर्षांत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून १८७४ कोटी

SCROLL FOR NEXT