Chess Olympiad 2022 Tamil Nadu Chief Minister MK Stalin announces 1 crore Rupee prize each team Player for winning Bronze ESAKAL
क्रीडा

Chess Olympiad : पदक विजेत्या प्रत्येक खेळाडूला 1 कोटी; स्टॅलिन यांची घोषणा

अनिरुद्ध संकपाळ

Chess Olympiad : तामिळनाडूचे सीएम स्टॅलिन (MK Stalin) यांनी बुद्धीबळ ऑलिम्पियाडमध्ये पदक जिंकणाऱ्या प्रत्येक खेळाडूला प्रत्येकी एक कोटी रूपयाचे बक्षीस जाहीर केले. चेन्नईमध्ये झालेल्या 44 व्या चेस ऑलिम्पियाडमध्ये भारतीय पुरूष ब संघाने कांस्य तर महिला अ संघाने देखील कांस्य पदक पटकावले. महिला संघाने पहिल्यांदाच चेस ऑलिम्पियाडमध्ये पदकाला गवसणी घातली. भारतीय महिला संघाचे नेतृत्व भारताची अनुभवी ग्रँडमास्टर हम्पीने केले होते.

चेन्नईमध्ये पार पडलेल्या 44 व्या चेस ऑलिम्पियाड स्पर्धेत भारतीय पुरूषांच्या ब संघाने कांस्य पदक पटकावले. भारतीय खुल्या संघात प्रज्ञानंदना, गुकेश, निहाल, रौनक आणि अधिबान यांचा समावेश होता. याचबरोबर भारताने महिला गटात पहिल्यांदा कांस्य पदक पटकावले. भारतीय महिला अ संघाने ही कामगिरी केली.

खुल्या गटात भारताच्या पुरूष ब संघाने अंतिम फेरीत जर्मनीचा 3 - 1 असा पराभव करत कांस्य पदकावर नाव कोरले. भारतीय ब संघ तिसऱ्या क्रमांकावर राहिला. उझबेकिस्तानने नेदरलँडचा 2 - 1 असा पारभव करत सुवर्ण पदक पटकावले. तर बुद्धीबळात दबदाबा असलेल्या अमेरिकेने खुल्या गटाचा अंतिम फेरीत स्पेनचा 2.5 - 1.5 असा पराभव केला.

भारताचा टॉप सिडेड महिला अ संघाला 11 व्या तसेच अंतिम फेरीत अमेरिकेकडून 3 - 1 असा पराभव सहन करावा लागला. त्यामुळे त्यांना सुवर्ण पदकापासून वंचित रहावे लागले. अंतिम फेरीत कोनेरू हम्पीच्या नेतृत्वातील भारतीय महिला अ संघ तिसऱ्या स्थानावर राहिला. त्यामुळे त्यांना कांस्य पदकावर समाधान मानावे लागले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

ENG vs IND, 2nd Test: रवींद्र जडेजानं मोडला BCCI चा 'हा' नियम; आता काय होणार कारवाई नेमक काय घडलं, वाचा!

Latest Maharashtra News Updates : पेशवे बाजीरावांच्या स्मारकासाठी सर्वात योग्य जागा म्हणजे NDA - गृहमंत्री अमित शाह

'ज्याने हे केलय त्याच्यावर आता...' मुलाबद्दल फेक न्यूज पसरवणाऱ्यावर रेशम टिपणीस भडकली, म्हणाली, 'तो ठणठणीत आहे.'

शरद उपाध्ये स्वतःची चूक स्वीकारायला तयारच नाहीत; उलट नेटकऱ्यांनाच दिलं ज्ञान, मग नेटकरीही भडकले, म्हणाले-

SCROLL FOR NEXT