चेन्नई : 44 वे चेस ऑलिम्पियाड (Chess Olympiad) भारतात आयोजित करण्यात आले आहेत. आजपासून (28 जुलै) सुरू होणाऱ्या या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा (Chess Olympiad Opening Ceremony) नुकताच चेन्नईच्या महाबलीपुरम येथे पार पडला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. या कार्यक्रमादरम्यान भारताचा पाचवेळा बुद्धीबळ जागतिक अजिंक्यपद पटकावणाऱ्या विश्वनाथन आनंदने (Viswanathan Anand) चेस ऑलिम्पियाडची मशाल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्याकडे सुपूर्द केली. त्यानंतर ही मशाल युवा ग्रँडमास्टर आर. प्रज्ञानंदा (R Praggnanandhaa) आणि इतरांकडे याच्याकडे देण्यात आली. हा उद्घाटन सोहळा चेन्नईच्या जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये रंगला.
या कार्यक्रमादरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण करताने म्हणाले की, तामिळनाडूमध्ये अनेक मंदिरे आहेत. त्याच्यावर सुंदर सुंदर शिल्प आहेत जी अनेक खेळांचे प्रतिनिधित्व करतात. तामिळनाडूचे बुद्धीबळाशी खूप घनिष्ट असे ऐतिहासिक संबंध आहेत. या राज्याने अनेक चेस मास्टर दिले आहेत. हे राज्य संस्कृती आणि सर्वात जुन्या तमिळ भाषेचे माहेरघर आहे.'
तामिळनाडू मधील महाबलीपुरम येथे होत असलेल्या 44 व्या चेस ऑलिम्पियाड स्पर्धा 28 जुलै ते 10 ऑगस्ट या कालावधीत होणार असून यामध्ये यजमान भारताला विजेतेपदाची सुवर्णसंधी असणार आहे. भारताचे सहा संघ या स्पर्धेमध्ये उतरणार आहेत. भारताला अमेरिका, नॉर्वे, अझरबैझान या देशांतील बुद्धिबळपटूंचे आव्हान असणार आहे.
या स्पर्धेमधील खुल्या गटात 188 तर महिला गटात 162 संघ सहभागी होणार आहेत. तसेच या स्पर्धेमध्ये खुल्या गटात 183 देशांचे, तर महिला गटात 160 देशांचे खेळाडू सहभागी होणार आहेत. भारतामध्ये पहिल्यांदाच बुद्धिबळ ऑलिंपियाडचे आयोजन करण्यात आले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.