Uber Cup Badminton Tournament  sakal
क्रीडा

Uber Cup Badminton Tournament : " उबेर करंडक बॅडमिंटन स्पर्धेत चीन-इंडोनेशिया अंतिम लढत

यजमान चीनने जपानचा ३-० असा उपांत्य फेरीत पराभव करून उबेर करंडक बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. विजेतेपदासाठी त्यांचा सामना इंडोनेशियाविरुद्ध होईल.

सकाळ वृत्तसेवा

चेंग्दू : यजमान चीनने जपानचा ३-० असा उपांत्य फेरीत पराभव करून उबेर करंडक बॅडमिंटन स्पर्धेत अंतिम फेरी गाठली. विजेतेपदासाठी त्यांचा सामना इंडोनेशियाविरुद्ध होईल. एकेरीत नावाजलेले खेळाडू असलेल्या इंडोनेशियाने गतविजेत्या दक्षिण कोरियाचे आव्हान ३-२ असे मोडून काढले.

ऑलिम्पिक विजेत्या चेन युफेईने अया ओहोरीला २१-१८, २१-१५ असे सरळ गेममध्ये पराभूत केले, त्याआधी जागतिक क्रमवारीत अव्वल असलेल्या चेन किंगचेन आणि जिया यिफान यांनी दुहेरीत नामी मात्सुयामा आणि चिहारू शिदा यांच्यावर १४-२१, २१-१३, २३-२१ असा पुनरागमन करत विजय मिळवला, त्यामुळे चीनने २-० अशी आघाडी घेतली. त्यानंतर बिंगजियाओने नोझोमी ओकुहाराचा २१-८, २१-१८ असा पराभव करून चीनला अंतिम फेरी गाठून दिली.

२०१६ नंतर चीनचा संघ प्रथमच मायदेशात अंतिम सामना खेळणार आहे. उबेर करंडक स्पर्धेच्या इतिहासात त्यांनी आत्तापर्यंत सर्वाधिक १५ वेळा विजेतेपद मिळवले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bank Privatization: 'ही' सरकारी बँक होणार खासगी! कधीही घोषणा होण्याची शक्यता, निर्णय अंतिम टप्प्यात

"कोण हिंदू? कोण मुस्लिम?" धर्माच्या भिंती ओलांडून 'बाप्पा' पाकिस्तानात! मूर्ती घडवतानाचा व्हिडिओ होतोय व्हायरल; Viral Video

रितेश देशमुखने पापाराझीकडून चक्क १०० रुपये उधार घेतले, पण का? अभिनेत्याने सांगितलं रस्त्यावर काय घडलं, म्हणाला-

Duleep Trophy Final: कर्णधार ईशान किशन पुन्हा चमकला, पण शतक थोडक्यात हुकलं; पडिक्कलनं घेतला शानदार कॅच; Video

Baramati Crime : बारामतीत छळाला कंटाळून विवाहितेने संपविले जीवन; पती व सासूविरुद्ध गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT