satwiksairaj rankireddy and chirag shetty sakal
क्रीडा

Badminton Competition : चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक-चिरागची आगेकूच

भारताचा प्रमुख बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉय, तसेच आशियाई सुवर्णपदक विजेती जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी यांनी चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

पीटीआय

शेन्झेन - भारताचा प्रमुख बॅडमिंटनपटू एच. एस. प्रणॉय, तसेच आशियाई सुवर्णपदक विजेती जोडी सात्विकसाईराज रंकीरेड्डी व चिराग शेट्टी यांनी चायना मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.

चायना मास्टर्समध्ये पुरुष एकेरीत आव्हान कायम असलेला जागतिक ब्राँझपदक विजेता प्रणॉय हा एकमेव भारतीय आहे.

उपउपांत्यपूर्व लढतीत गुरुवारी त्याने ४० मिनिटांत डेन्मार्कच्या मॅग्नस जोहान्नसन याच्यावर २१-१२, २१-१८ असा विजय प्राप्त केला. या स्पर्धेत प्रणॉयला आठवे मानांकन आहे. अखेरच्या आठ खेळाडूंच्या फेरीत त्याच्यासमोर जपानच्या तृतीय मानांकित कोदाई नाराओका याचे आव्हान असेल.

पुरुष दुहेरीच्या जागतिक क्रमवारीत पाचव्या स्थानी असलेल्या सात्विक व चिराग यांना चायना मास्टर्समध्ये अव्वल मानांकन आहे. उपांत्यपूर्व फेरी गाठत त्यांनी दुहेरीतील भारताचे आव्हान कायम राखले. आगेकूच राखताना त्यांनी जपानच्या अकिरा कोगा व ताईची साईतो जोडीवर २१-१५, २१-१६ असा विजय मिळवला. पुढील फेरीत इंडोनेशियाची लिओ रॉली कार्नांडो व डॅनिएल मार्टिन जोडी सात्विक-चिराग जोडीची प्रतिस्पर्धी असेल.

पुरुष एकेरीत जोहान्नसनविरुद्ध प्रणॉयने शानदार सुरुवात केली. पहिल्या गेममध्ये त्याने ६-१ अशी मोठी आघाडी घेतली, नंतर डेन्मार्कच्या खेळाडूने पिछाडी ८-६ अशी कमी केली, नंतर १४-११ अशी स्थिती असताना भारतीय खेळाडूने सारा अनुभव पणाला लावत प्रतिस्पर्ध्याला दीर्घ रॅलीजमध्ये गुंतवले. जोहान्नसन दमल्याची संधी साधत प्रणॉयने पहिला गेम खिशात टाकला.

दुसरा गेम जास्तच रंगतदार ठरला. दोन्ही खेळाडूंनी १५-१५ अशी बरोबरी साधली, नंतर प्रत्येकी १८ गुण असताना प्रणॉयने निर्णायक टप्प्यावर मुसंडी मारत उपांत्यपूर्व फेरीतील जागा निश्चित केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT