क्रीडा

पैसा वसूल अंतिम सामन्याचा निर्धार 

शैलेश नागवेकर

अहमदाबादः प्रो कबड्डीच्या सातव्या मोसमाचा पडदा तीन महिन्यांनंतर उद्या (ता. 19) नव्या विजेत्याचे नाव करंडकावर कोरून खाली येणार आहे. प्राथमिक साखळीतील अव्वल दोन संघ दबंग दिल्ली आणि बंगाल वॉरियर्स एकमेकांशी पंगा घेण्यास सज्ज होत आहेत. निकाल कोणताही लागला, तरी प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा थरारक सामना खेळून कबड्डीला जिंकवायचा विडा दोन्ही संघांनी उचलला आहे. 

अंतिम सामन्यात खेळणारे दोन्ही संघ तुल्यबळ आहेत, ज्याचे नशीब जोरावर असेल तो यशस्वी होईल, बंगाल संघाचे प्रशिक्षक बी.सी. रमेश यांची ही भावना; तर कबड्डी किती शिस्तप्रिय पद्धतीने खेळता येते, हे दिल्लीचे प्रशिक्षक किशनकुमार हुडा यांचे वक्तव्य आव्हानाच्या भाषांपलिकडचे असले, तरी दोन्ही संघातील खेळाडूंची क्षमता आणि संपूर्ण लीगमध्ये केलेला खेळ पाहता थरारक सामन्याची मेजवानी मिळणार, याची खात्री आहे. 

तीन वर्षांपूर्वी ज्या ट्रान्स स्टेडियामध्ये विश्वकरंडक कबड्डीचा अंतिम सामना झाला होता, तिथेच प्रो कबड्डीचा निर्णायक सामना भारतीय कबड्डीच्या नव्या पिढीच्या कर्तृत्वावर मोहर उमटवणारा ठरणार आहे. 

संघ सहकाऱ्यातील सामना 
किशन हुडा भारतीय संघाचे कर्णधार असताना त्यांच्या संघातून बी. सी. रमेश खेळत होते. आता हेच दोघे एकमेकांचे प्रतिस्पर्धी प्रशिक्षक असले तरी नाते सहकाऱ्याचेच राहील, असे वातावरण अंतिम सामन्यापूर्वी होते. 

वरचढ कोण? 
गटातील प्रत्येकी 22 सामन्यानंतर दिल्लीने पहिले, तर बंगालने दुसरे स्थान मिळवले. दिल्लीने अन्य सर्व 11 संघांविरुद्ध विजय मिळवलेले असले, तरी त्यांना बंगालला हरवता आलेले नाही. दोघांमधला एक सामना टाय झाला होता; तर दुसऱ्या सामन्यात बंगालने मोठा विजय मिळवला आहे. त्यामुळे एकूणच कामगिरी पाहता दिल्लीचे पारडे जड असले, तरी झुकते माप बंगालकडे आहे. 

विशाल मानेला इतिहासाची संधी 
विशाल माने खेळत असलेला दिल्लीचा संघ उद्या जिंकला, तर तीन वेगवेगळ्या संघातून जिंकणारा तो पहिला खेळाडू ठरेल. यू मुम्बा आणि पाटना संघातून खेळताना त्याने करंडक उंचावला आहे. अंतिम सामन्यात खेळणारा तो सर्वात अनुभवी आहे. त्याचा हा पाचवा अंतिम सामना आहे. यू मुम्बा संघातून आणखी दोनदा उपविजेता राहिलेला आहे. 

दृष्टिक्षेपात 
- बंगालचे प्रशिक्षक बी. सी. रमेश यांना दुसऱ्यांदा विजेतेपदाची संधी. गतविजेत्या बंगळूरु संघाचे ते सहाय्यक प्रशिक्षक 
- बंगालच्या जीवा कुमारचा चौथा अंतिम सामना (एकदा विजेता, दोनदा उपविजेता - तिन्ही यू मुम्बाकडून) 
- बंगालचे सुकेश हेगडे (मोसम पाच) आणि पप्रंजन (मोसम सहा) गुजरातकडून खेळताना उपविजेते. 
- दिल्लीचा नवीन कुमार वि. बंगालचा मनिंदर यांच्यात मुख्य लढत 
- नवीन कुमारचे यंदा सलग 21 वेळा सुपर टेन. 
- एकमेकांविरुद्ध ः एकूण 14 सामने. प्रत्येकी सहा विजय, दोन बरोबरी. यंदाच्या मोसमात बंगालचा एक विजय, एक बरोबरी. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

SCROLL FOR NEXT