Christiano Ronaldo offered From Al Nassr  esakal
क्रीडा

Christiano Ronaldo : रोनाल्डोला सौदीच्या क्लबकडून 1800 कोटींची ऑफर?

अनिरुद्ध संकपाळ

Christiano Ronaldo offered From Al Nassr : पोर्तुगालचा कर्णधार ख्रिस्तियानो रोनाल्डो सध्या कतारमध्ये फिफा वर्ल्डकप खेळण्यात व्यग्र आहे. मात्र वर्ल्डकप सुरू होण्यापूर्वीच त्याने उघड उघड मँचेस्टर युनायडेटविरूद्ध मोर्चा खोलून फुटबॉल जगतात एकच खळबळ उडवून दिली होती. यानंतर मँचेस्टरने रोनाल्डोसोबतचा करार रद्द करत त्याला नारळ दिला. आता रोनाल्डो पुढे कोणत्या क्लबकडून खेळणार याबाबत जोरदार चर्चा सुरू आहे. ही चर्चा सुरू असतानाच सौदी अरेबियाच्या एका मोठ्या क्लबकडून ख्रिस्तियानो रोनाल्डोला मोठी ऑफर मिळाली आहे. सौदी अरेबियाच्या एल नास्सर फुटबॉल क्लबकडून रोनाल्डोला 225 मिलियन डॉलर्सची (1800 कोटी रूपयांपेक्षाही जास्त) ऑफर मिळाली आहे.

ख्रिस्तियानो रोनाल्डोने वर्ल्डकपपूर्वी मँचेस्टर युनायटेड क्लबचे मॅनेजर एरिक टेन हॅग यांच्यावर जहरी टीका केली होती. पिअर्स मॉर्गन यांना दिलेल्या मुलाखतीत त्याने क्लबच्या वरिष्ठ अधिकाऱ्यावरही त्याला क्लबमधून बळजबरीने काढून टाकण्याचा कट रचल्याचा आरोप केला होता. यानंतर मँचेस्टरने रोनाल्डोसोबतचा करार रद्द करत त्याला एक दमडी देखील दिली नाही.

दरम्यान, रोनाल्डोने अनेक युरोपीयन फुटबॉल क्लबकडे चाचपणी केली होती. मात्र या सर्वांनी फारशी उत्सुकता दाखवलेली नाही. दरम्यान, सीबीएस स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार 37 वर्षाच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोला सौदी अरेबियाच्या एल नास्सर फुटबॉल क्लबने तीन वर्षांसाठी तब्बल 225 मिलियन डॉलर्सची ऑफर दिली आहे.

सीबीएस स्पोर्ट्सच्या वृत्तानुसार सध्या कतारमध्ये वर्ल्डकप खेळत असलेला रोनाल्डो हा बऱ्याच काळापासून अल नास्सरकडून खेळण्यासाठी उत्सुक होता. मात्र आता क्लबने रोनाल्डोमध्ये कधी नव्हे इतका रस दाखवण्यास सुरूवात केली आहे.

हेही वाचा : दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News: मराठी डिजिटल न्यूजमध्ये eSakal पुन्हा नंबर 1; Comscoreच्या ताज्या आकडेवारीत 7.4 कोटींचा टप्पा

Chandgad MD Drugs Case: चंदगड पोलिस, पालकांची जबाबदारी वाढली; हाजगोळी ड्रग्ज प्रकरण; मुलांच्या वर्तणुकीकडे लक्ष ठेवण्याची गरज

Shaktipeeth Highway : नागपूर-गोवा शक्तिपीठ महामार्गाला बांदावासियांचा तीव्र विरोध! 214 एकर जमीन बाधित होणार, ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर

Latest Marathi News Live Update : जसप्रीत बुमराहला मागे टाकत मिचेल स्टार्क कसोटी क्रमवारीत अव्वल

Sparrow Chick Rescue : घरट्यातून पिल्लू खाली पडलं अन्...; चिमणीची लेकरासाठी जीवाचा आकांत करणारी धडपड पाहून उपस्थितांचे डोळे पाणावले, हॉस्पिटलबाहेरील 'तो' प्रसंग नक्की काय?

SCROLL FOR NEXT