Colombia defeated Uruguay 1-0 to reach in copa final after 23 years Sakal
क्रीडा

COPA America 2024 : कोलंबियाचा २३ वर्षांनंतर अंतिम फेरीत प्रवेश

उत्तरार्धात दहा खेळाडूंसह खेळणाऱ्या कोलंबिया संघाच्या जेफरसन लेर्मा याने ३९व्या मिनिटाला केलेल्या गोलच्या जोरावर उरुग्वेवर १-० अशी मात केली

सकाळ वृत्तसेवा

चार्लोट, नॉर्थ कॅरोलिना (अमेरिका) : उत्तरार्धात दहा खेळाडूंसह खेळणाऱ्या कोलंबिया संघाच्या जेफरसन लेर्मा याने ३९व्या मिनिटाला केलेल्या गोलच्या जोरावर उरुग्वेवर १-० अशी मात केली आणि कोपा अमेरिका फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. कोलंबियाने तब्बल २३ वर्षांनंतर कोपा अमेरिका स्पर्धेची अंतिम फेरी गाठली.

याआधी त्यांनी २००१ मध्ये या स्पर्धेच्या जेतेपदावर मोहर उमटवली होती. आता अजिंक्यपदाच्या लढतीत कोलंबियासमोर मेस्सीच्या अर्जेंटिना संघाचे आव्हान असणार आहे. उरुग्वे-कोलंबिया यांच्यामधील लढतीत दोन्ही संघांतील खेळाडूंकडून आक्रमक खेळ झाला.

या लढतीत सात पिवळे कार्ड व एक लाल कार्ड दाखवण्यात आले. कोलंबियाच्या डॅनियल मुनोज याला ४६व्या मिनिटाला दुसरे पिवळे कार्ड दाखवण्यात आले. परिणामी, त्याला बाहेर काढण्यात आले. त्यामुळे कोलंबियाला उत्तरार्धात दहा खेळाडूंसह मैदानात उतरावे लागले. तरीही उरुग्वेला गोल करता आला नाही.

उरुग्वेचा संघ कोलंबियाकडून पराभूत झाल्यामुळे आता तिसऱ्या क्रमांकासाठी त्यांना कॅनडाशी लढावे लागणार आहे. गतविजेत्या अर्जेंटिनाने बुधवारी कॅनडाला पराभूत करून अंतिम फेरीत प्रवेश केला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Akola News: जिल्हाधिकाऱ्यांची गॅस एजन्सींना भेट; वितरण व्यवस्थेचा आढावा ;नागरिकांना संयमाचे आवाहनः ‘सकाळ’च्या वृत्तमालिकेची दखल

Shikhar Shinganapur: संत तेल्या भुत्याच्या कावडीने सर केला मुंगी घाट, घर जाळून यात्रेला जायचे अन्...; काय आहे अख्यायिका?

Akola News : अर्थसंकल्पीय सभेत सत्ताधारी-विरोधकांचा ‘तमाशा’; चर्चा न करता ‘राजकारण’ ;विरोधी गटातील १६ नगरसेवकांचे तीन सभांसाठी निलंबन

पोलिस आयुक्त म्हणाले..! सोलापुरात ‘डीजे’ला बंदी, कोणीही बुकिंग करू नये; मिरवणुकीत आवाजाची मर्यादा पाळून लावता येणार 4 स्पीकर, वाचा...

Pune ST Ashtavinayak tour: एसटी महामंडळाची ‘हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तीर्थाटन योजना’ सुरू; पुण्यातून अष्टविनायक दर्शन टूर पॅकेजची पहिली बस ४ एप्रिलला

SCROLL FOR NEXT