comedian abijit ganguly says miss Pepsi Coke ads days during cricket amide betting gutkha ads ipl 2023  
क्रीडा

'बेटिंग कर लो, गुटका ले लो…', IPL मधील जाहिरातींना कॉमेडीयन वैतागला; म्हणे, मला ते कोक अन् पेप्सी…

रोहित कणसे

आपल्या देशात क्रिकेटचं वेड लहान थोर अशा सगळ्यांमध्ये दिसून येतं. तसेच सध्या देशात आयपीएल (IPL 2023) ची धूम सुरू आहे. जवळपास दोन महिने हे लीग सामने चालणार आहेत. मात्र क्रिकेट सामन्यांदरम्यान दाखवण्यात येणाऱ्या जाहिराती या सध्या चर्चेचा विषय बनल्या आहे. (comedian abijit ganguly on Ads during Cricket Matches)

क्रिकेट सामन्यांमध्ये ऑनलाईन सट्टा आणि गुटखा यासंबंधीच्या जाहीराती सर्रास दाखवल्या जातात. वैताग आणणाऱ्या या जाहीरातीबद्दल प्रसिध्द स्टँड अप कॉमेडियन आणि क्रिकेट प्रेमी अभिजीत गांगुली (Abijit Ganguly) यांनी ट्वीट करत खंत व्यक्त केली आहे.

हेही वाचा - सामान्यांचा पैसा सुरक्षित ठेवण्यासाठीच Virtual Currency करकक्षेत

गांगुली यांनी सध्या टीव्ही आणि ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर दाखवण्यात येणाऱ्या ऑनलाईन बेटिंग आणि पान मसाला कंपन्यांच्या जहिरातींदरम्यान कोक आणि पेप्सीच्या जाहीरातींची आठवण येत असल्याचे म्हटलं आहे. नव्वदीच्या दशकात जन्मलेल्या सगळ्यांनी क्रिकेट दरम्यान कोक आणि पेप्सीच्या जाहीराती पाहिलेल्या आहेत.

"जाहिरातींदरम्यान आजकाल चालणारं सगळं क्रिकेट हे बेटिंग कर लो, रम्मी खेल लो, गुटखा ले लो थोडा सा, पोकर खेल के तो देखो एक बार या… यार मला पेप्सी आणि कोकच्या जाहिरातींचे दिवस आठवत आहेत" असं ट्वीट अभिजीत गांगुली यांनी केलं आहे.

केंद्राच्या मार्गदर्शक सूचना जारी

केंद्र सरकारने ऑनलाइन गेमिंगमधील बेकायदेशीर सट्टेबाजीवर बंदी घालण्यासाठी एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने सर्व मीडिया प्लॅटफॉर्मला संबंधित जाहिराती न दाखवण्याचा सल्ला दिला आहे. केंद्रीय आयटी आणि दळणवळण राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी याबाबत माहिती दिली.

राजीव चंद्रशेखर म्हणाले की, आजपासून सट्टेबाजी बंद करण्यात आली आहे. ऑनलाइन खेळात बेटिंग करणे आता बेकायदेशीर मानले जाईल. ते म्हणाले की, जे ऑनलाइन गेम जुगार किंवा सट्टेबाजीला प्रोत्साहन देत आहेत, किंवा त्यावरून वापरकर्त्यांचे नुकसान होणार असेल आणि ज्यामुळे व्यसनाधीनता वाढत असेल, यापैकी एकही घटक आढळून आला तर ते ऍप भारतात उपलब्ध होणार नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

India's first bullet train : भारताची पहिली बुलेट ट्रेन कधी धावणार?, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी थेट तारीखच सांगितली

Fastag Rules Change: १ फेब्रुवारी पासून बदलणार 'फास्टॅग'चे नियम!, नवीन वर्षात सरकारकडून वाहनचालकांना मिळणार दिलासा

T20 World Cup 2026 च्या सेमीफायनलमध्ये कोणते ४ संघ पोहचणार? हरभजन सिंगची भविष्यवाणी; भारतीय संघाबद्दल म्हणाला...

Bhopal Crime: महिलांची अंतर्वस्त्रे चोरायचा अन् स्वतः घालून झोपायचा; पोलिसांनी काढला माग, धक्कादायक कारण आलं समोर

Ajit Pawar: अजित पवारांच्या हेलिकॉप्टरमधून बजरंग सोनवणेंचा प्रवास; बीडच्या राजकारणात नवा ट्विस्ट

SCROLL FOR NEXT